अखेर सोने 50 हजारांवर! तेजीचे अजूनही मिळताहेत संकेत | Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold
अखेर सोने 50 हजारांवर! तेजीचे अजूनही मिळताहेत संकेत

अखेर सोने 50 हजारांवर! तेजीचे अजूनही मिळताहेत संकेत

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : शहरातील सोने (Gold) - चांदी (Silver) बाजारपेठेत कालपासून (गुरुवार) आज (शुक्रवारी) सोन्याच्या भावाने दीर्घ कालावधीनंतर 50 हजार रुपयांवर प्रतितोळा अशा विक्रमी भावाची धडक मारली आहे. बदलत्या जागतिक घडामोडी व अर्थकारणाच्या आधारावर सोन्याचे भाव तेजीत आले आहेत. तब्बल एक वर्ष गुंतवणूकदार व ग्राहकांना दरातील मंदीचा लाभ देत असताना आता सोन्याचे दर मात्र आणखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

मागील काही दिवसांपासून सातत्याने सोन्याचे भाव वाढणार, असे सांगितले जात होते. तरीही दिवाळीपर्यंत कमी भावाचा लाभ ग्राहक व गुंतवणूकदारांना झाला. कोरोनाची विस्कळित बाजारपेठ व जागतिक अर्थकारणामुळे सोन्याचे भाव मंदीत होते. तब्बल एक वर्षापासून सोन्याचे भाव कमी झालेले होते. पण कोरोनाकाळात ग्राहकी देखील कमी झालेली होती. केवळ या स्थितीचा लाभ गुंतवणूकदारांनी अधिक प्रमाणात घेतला. कोरोनाची लाट ओसरून नंतर दिवाळीत ग्राहकांनी या मंदीच्या स्थितीचा लाभ घेतला.

हेही वाचा: मारुती चितमपल्ली म्हणाले, हंस हा दूध व पाणी वेगळे करत नाही, तर...

आता लग्नसराई आल्यानंतर ग्राहकीत वाढ होणार हे निश्‍चित होते. त्यासोबत आंतरराष्ट्रीय तेलाचे भाव, रुपयांची डॉलरच्या तुलनेत किंमत व इतर कारणे त्यासाठी दिली जात होती. तरीही सोन्याचे भाव हळहळू वाढत गेले. आता सोने-चांदी बाजारात सोन्याचे भाव 50 हजार रुपयांवर पोचले आहेत. या वाढीत आता पुरवठा व मागणीतील तफावतीचा मुद्दादेखील महत्त्वाचा मानला जात आहे. भावातील वाढ ही संथ असली तरी 50 हजारांचा आकडा हा गुंतवणूकदार व ग्राहकांचे लक्ष वेधून घेणारा ठरतो. या स्थितीत सोन्याच्या दरवाढीचा परिणाम बाजारावर नेमका कसा होईल, हे पुढील आठवडाभरात स्पष्ट होणार आहे. कमी भावात सोने खरेदी करणारे गुंतवणूकदार आता सोने विक्रीस काढण्याची शक्‍यता देखील आहे. तसेच लग्नसराईमुळे ग्राहकी कायमच राहण्याचा अंदाज आहे.

प्रवास सोन्याच्या दराचा

  • 2 नोव्हेंबर : 49350

  • 3 नोव्हेंबर : 48300

  • 4 नोव्हेंबर : 48950

  • 6 नोव्हेंबर : 49150

  • 7 नोव्हेंबर : 49160

  • 8 नोव्हेंबर : 49520

  • 9 नोव्हेंबर : 49520

  • 10 नोव्हेंबर : 49530

  • 11 नोव्हेंबर : 50480

  • 12 नोव्हेंबर : 50490

हेही वाचा: तरच होईल पंतप्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे स्वच्छ पंढरपूर तीर्थक्षेत्र!

सोने दरवाढ ही संथगतीने होत गेली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम फारसा होणार नाही. तरीही चार दिवसात या दरवाढीचे चित्र अधिक स्पष्ट होऊ शकणार आहे.

- मिलिंद वेणेगूरकर, आपटे सराफ, सोलापूर

अजूनही सोने दरवाढीचे संकेत मिळत आहेत. जागतिक बाजाराच्या बदलत्या स्थितीचे हे परिणाम आहेत. तरीही ग्राहकी मात्र भक्कम राहणार आहे.

- सिद्धाराम शिनगारे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सराफ व सुवर्णकार संघ, सोलापूर

loading image
go to top