तरच होईल पंतप्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे स्वच्छ पंढरपूर तीर्थक्षेत्र!

...तरच होईल पंतप्रधान मोदींच्या अपेक्षेप्रमाणे सर्वांत स्वच्छ पंढरपूर तीर्थक्षेत्र!
...तरच होईल पंतप्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे सर्वांत स्वच्छ पंढरपूर तीर्थक्षेत्र!
...तरच होईल पंतप्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे सर्वांत स्वच्छ पंढरपूर तीर्थक्षेत्र!Sakal
Summary

पंढरपूर सर्वांत स्वच्छ तीर्थक्षेत्र व्हावे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपेक्षापूर्तीसाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे.

पंढरपूर (सोलापूर) : भविष्यात पंढरपूर (Pandharpur) हे देशातील सर्वांत स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षा पालखी मार्ग भूमिपूजनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सोमवारी व्यक्त केली होती. त्यांच्या अपेक्षेच्या तुलनेत सध्या पंढरपूर कोसो दूर आहे, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे पंतप्रधानांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाला, पंढरपूर नगरपालिकेला आणि स्थानिक नागरिकांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील.

पालखी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तीन गोष्टी आशीर्वादरूपाने द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामधील सर्वात महत्त्वाची अपेक्षा त्यांनी पंढरपूरच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने व्यक्त केली. भविष्यात पंढरपूर हे भारतातील सर्वांत स्वच्छ तीर्थक्षेत्र झालेले आपल्याला पाहायचे आहे. सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून श्री विठोबाच्या पंढरपूरचे नाव घेतेले गेले पाहिजे. हे काम देखील लोकसहभागातूनच होईल. स्थानिक लोकांनी प्रयत्न केले तर पंढरपूर निश्‍चित स्वच्छ सुंदर होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. त्यांच्या अपेक्षांची काही प्रमाणात तरी पूर्तता व्हावी यासाठी शासन, नगरपालिका आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत.

...तरच होईल पंतप्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे सर्वांत स्वच्छ पंढरपूर तीर्थक्षेत्र!
पंढरीच्या विठूरायाला अर्पण केलेले सोने मुंबईत वितळवणार!

सफाई कामगारांची संख्या वाढवावी

पंढरपूर शहराची लोकसंख्या सुमारे सव्वालाखाच्या घरात आहे. गेल्या काही वर्षात शहरातील लोकवस्ती लांबपर्यंत वाढली आहे. अनेक उपनगरे झाली आहेत. परंतु, पालिकेकडे कायमस्वरूपी अवघे 364 सफाई कामगार आहेत. त्यामुळे शहराच्या विस्ताराच्या तुलनेत सफाई कामगारांची संख्या अत्यल्प आहे. साहजिकच शहराच्या अनेक भागात नियमित स्वच्छता होऊ शकत नाही. उपनगरीय भागात तर आठवड्यातून, पंधरा दिवसातून एकदा सफाई कामगार पाठवून थातूरमाथूर स्वच्छता केली जाते. पंढरपूर पालिकेने अनेक वेळा सफाई कामगारांची संख्या वाढवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. परंतु, 1994 पासून आकृतिबंधामुळे नगरपालिकेला एकही कायमस्वरूपी सफाई कामगार वाढवायला शासनाने मंजुरी दिलेली नाही. शहराच्या सर्व भागात नियमित स्वच्छता करायची झाल्यास पंढरपूरसाठी खास बाब म्हणून आणखी किमान 200 कायमस्वरूपी सफाई कामगार वाढवण्यास शासनाने मंजुरी दिली पाहिजे.

यात्रा काळात तात्पुरती व्यवस्था

श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या निमित्ताने दररोज सुमारे पंचवीस हजाराहून अधिक भाविक वर्षभर पंढरपूरला येत असतात. त्यांच्याकडूनही शहरात अनेक भागात कचरा टाकला जातो. शहर स्वच्छतेसाठीच अपुरी यंत्रणा असताना यात्रेकरुंकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची त्यामध्ये भर पडते. यात्रा काळात तात्पुरते एक हजार सफाई कामगार नेमून शहराची स्वच्छता केली जाते आणि त्यानंतर मात्र पुन्हा केवळ 364 सफाई कामगारांकडून शहरात साफसफाई केली जाते. शहराच्या विस्ताराच्या तुलनेत सफाई कामगार संख्या अत्यल्प असल्याने साहजिकच अनेक भागात अस्वच्छता दिसते.

केवळ 40 घंटागाड्या!

घराघरातून दररोज सरासरी 40 टन कचरा उचलला जातो. त्यासाठी 40 घंटागाड्या आणि एका ट्रॅक्‍टरची व्यवस्था करण्यात आली आहे. कचरा कुंड्यांमधील कचरा पालिकेच्या यंत्रणेकडून उचलून नेला जातो. यात्राकाळात चार-पाच दिवस तब्बल 120 टन कचरा उचलण्यात येतो. परंतु, तरीही अनेक भागात कायम कचरा रस्त्यावर पडल्याचे दिसून येते.

स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रणा हवी

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून काही वर्षांपूर्वी सुमारे चार कोटी रुपये पंढरपूर शहरातील स्वच्छतेच्या कामासाठी देण्यात आले होते. त्यातून शहरातील कचरा कुंड्यांतून कचरा उचलण्यासाठी कॉम्पॅक्‍टर, भुयारी गटार स्वच्छ करण्यासाठी जेटिंग मशिन, रस्ते स्वच्छ करण्यासाठी रोड स्वीपर अशी यंत्रणा पालिकेकडे देण्यात आली होती. परंतु, ही मशिन चालवण्यासाठी इंधनावर आणि देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेला मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे रोड स्वीपर वापरलाच जात नाही. आगामी काळात शहराच्या स्वच्छतेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर आधुनिक यंत्रे उपलब्ध झाली पाहिजेत. केवळ आधुनिक यंत्रणा देऊन भागणार नाही तर त्या यंत्रणेच्या देखभाल, दुरुस्ती आणि इंधनाचा खर्च याचीही तरतूद करायला हवी.

चंद्रभागा वाळवंट स्वच्छतेसाठी यंत्रणा हवी

चंद्रभागा वाळवंट महसूल विभागाच्या ताब्यात आहे. वाळू लिलावातून महसूल विभागाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. परंतु, चंद्रभागा वाळवंटाची स्वच्छता नगरपालिकेला करावी लागते. मुळात नागरी वस्ती असलेल्या शहरातील स्वच्छतेला पालिकेकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे मग शहरातील स्वच्छता थांबवून यात्रेच्या वेळी पालिकेला वाळवंट स्वच्छ करावे लागते. मध्यंतरी मंदिर समितीने वाळवंट आणि प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसर स्वच्छतेची जबाबदारी घेतली होती. परंतु मागील दोन वर्षांपासून समितीने ते काम थांबवल्याने पुन्हा पालिकेवरच जबाबदारी आली आहे. वाळू लिलावातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवणाऱ्या महसूल विभागावर चंद्रभागा वाळवंटाच्या स्वच्छतेचे काम दिले पाहिजे.

ठळक मुद्दे

  • सफाई कामगारांची संख्या किमान 200 ने वाढवावी

  • आधुनिक स्वच्छता यंत्रे आणि त्यासाठीच्या खर्चाची तरतूद

  • चंद्रभागा वाळवंटाच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा हवी

  • नागरिकांनी घंटागाडीकडे ओला व सुका कचरा वेगवेगळाच देणे गरजेचे

...तरच होईल पंतप्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे सर्वांत स्वच्छ पंढरपूर तीर्थक्षेत्र!
शंकरराव मोहिते बॅंकेच्या व्यवस्थापकांनी केली फेरलेखापरीक्षणाची मागणी

1994 मध्ये शहरातील उघड्या गटारी बंद करून भुयारी गटार योजना राबवण्यात आली. त्यानंतर शहराच्या बहुतांश भागात टप्प्याटप्प्याने भुयारी गटाराचे काम केले गेले. भुयारी गटाराच्या पाइप लहान पडत असल्याने पाइप तुंबण्याचे प्रकार सतत होत आहेत. नागरिकांनी घंटागाडीकडे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा देणे अपेक्षित आहे. परंतु एकाच कंटेनरमधून दोन्ही प्रकारचा कचरा दिला जातो. सॅनिटरी कचराही त्यातच टाकलेला असतो. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेबरोबरच नागरिकांनी देखील योगदान देणे गरजेचे आहे. पालिका आणि नागरिकांच्या सकारात्मक प्रयत्नातून शहर स्वच्छ ठेवता येईल.

- शरद वाघमारे, मुख्य आरोग्य निरीक्षक, नगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com