
मुंबई - ‘महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहिण’ योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील २.५ कोटी महिलांच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जात आहेत. या योजनेमुळे महिलांचा आर्थिक आधार मजबूत झाला आहे. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यावर आगामी अर्थसंकल्पात भर देण्यात येणार आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले.