वशिल्यापेक्षा गुणवत्तेने यश मिळवा - अजित पवार

Ajit-Pawar
Ajit-Pawar
Updated on

बावधन - सध्याचे युग स्पर्धेचे आहे. त्यामुळे त्यात टिकण्यासाठी वशिल्यापेक्षा गुणवत्ता सिद्ध करण्याचे दिवस सुरू झाले आहेत, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हाळुंगे-बालेवाडी येथे केले.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने श्री शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा झाली. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, क्रीडा व युवक सेवा सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, संजय जगताप, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे, राजाभाऊ हगवणे, बाबूराव चांदेरे, ‘दबंग’ फेम सिनेअभिनेता अशोक समर्थ आदी उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. 

पवार पुढे म्हणाले, ‘शारीरिक कसरतीबाबत जागतिक सर्व्हे झाला. त्यात सर्वांत कमी चालणाऱ्यांचे प्रमाण भारतीयांचे असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतीयांमध्ये व्यायाम, चालणे आणि खेळाच्या आवडीसाठी क्रीडाक्षेत्राचे धोरण बदलण्याची आवश्‍यकता आहे. नव्या सरकारच्या माध्यमातून खेळासाठी व खेळाडूंसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातील.’

प्रास्ताविकात मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सेवक सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. उपसचिव मा. एल. एम. पवार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. हरिदास खेसे, प्रा. माधुरी बोरगे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com