बीड : सह्याद्री देवराईला भीषण आग; दोन एकरवरील झाडं जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sayadri Devrai Beed
बीड : सह्याद्री देवराईला भीषण आग; दोन एकरवरील झाडं जळून खाक

बीड : सह्याद्री देवराईला भीषण आग; दोन एकरवरील झाडं जळून खाक

बीडमधील सह्याद्री देवराईला भीषण आग लागली असून इथल्या दोन एकरमधील बहुतांश झाडं ही जळून खाक झाली आहेत. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश आलं, पण या आगीत वड, पिंपळ, लिंब अशी झाडं जळून खाक झाली आहेत. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रयत्नातून ही देवराई तयार झाली आहे. (fire at Beed Sahyadri Devrai developed by Sayaji Shinde Burn trees on two acres)

या दुर्घटनेबाबत बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, "अशा प्रकारे झाडांना आग लावणं ही विकृती आहे. जगातील झाडांचं सर्वात व्यस्त प्रमाण हे बीडमध्ये आहे तरी देखील इथं झाडांना आग लावली जाते. गेल्या चार वर्षांपासून आम्ही या झाडांची काळजी घेत आहोत. झाडांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं कुंपणही घातलं आहे. इथं झाडांचं रोपण करणं अवघड असून वेगवेगळ्या प्रकारची झाडं आम्ही इथं आणून ती रुजवली. या घटनेची वन विभाग, पोलीस आणि स्थानिकांनी चौकशी करायला हवी"

या घटनेसाठी कोणाला दोष द्यावा हे मला कळतं नाहीए. पण हे झालेलं नुकसानं खूप मोठ आहे. या प्रजासत्ताक दिनी १०० वर्षांचं जुनं झाडं पुण्यातून आम्ही बीडला नेऊन लावलं. त्यानंतर आज ही आगीची घटना ऐकून वाईट वाटलं. ही आग नैसर्गिक नसून पर्यटकांपैकीच कोणीतरी ही आग लावली असल्याचा संशयही यावेळी सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.

बीडमध्ये ३५ टक्के झाडांचं प्रमाण असणं गरजेचं असताना तिथं केवळ दोनच टक्के झाडं आहेत. सर्वात जास्त लाकूड कटाईचे कारखाने तिथं आहेत. असं असताना आपण जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न केला. सोलापूरमध्ये नव्या दोन देवराईंचं उद्घाटन आम्ही करण्यासाठी आलेलो असतानाच बीडमधील देवराईला आग लागल्याचं कळाल्यानं अतिशय वाईट वाटलं आहे. वन विभागाकडून अशी बेफिकिरी व्हायला नको अशी अपेक्षा यावेळी सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.

Web Title: Fire At Beed Sahyadri Devrai Developed By Sayaji Shinde Burn Trees On Two Acres

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top