
शहरातील मुलताई चौक परिसरात शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला.
अमरावतीत शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर गोळीबाराने खळबळ
सध्या राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसा पठणासाठीचा मुंबई दौरा आणि शिवसैनिकांचा राडा या घटनेनं राजकारण चांगलंच तापलं आहे. हे सगळं सुरु असताना इकडे अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश घारड (Yogesh Gharad) यांच्यावर शनिवारी रात्री वरुड शहरात प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं शहरात खळबळ निर्माण झाली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या घारड यांना अधिक उपचारांसाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे.
हेही वाचा: युक्रेनच्या प्रत्युत्तराने रशियाची पीछेहाट
घडलेली घटना अशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर वरुड शहरातील मुलताई चौक परिसरात शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला. हल्लेखोर गोळ्या झाडून पसार झाला असल्याची माहिती मिळत आहे. घराड यांच्यासोबत असलेल्या नंदू काळे व अन्य सहकाऱ्यांनी हल्लेखोराचा पाठलाग केला मात्र तो हाती लागला नाही. राहुल तडस असे हल्लेखोराचे नाव असून त्याचा शोध सुरु आहे. योगेश घारड यांच्या डाव्या मांडीला गोळी लागली आहे. उपाचारासाठी त्यांना सुरुवातीला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, योगेश घारड यांच्यावर हल्लेखारोने केलेल्या या हल्ल्यामागचे कारण समजू शकलेले नाही. घारड यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालय परिसरात त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. तणावाची स्थिती लक्षात घेत शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून घारड समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता कमी
Web Title: Firing On Shivsena Leader Of Yogesh Gharad In Amravati Warud City
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..