भीमा-कोरेगाव हिंसाचार; सुधा भारद्वाजांची जामिनावर मुक्तता

sudha bharadwaj
sudha bharadwajesakal

मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार (Bhima koregaon) आणि शहरी नक्षलवाद प्रकरणात पहिला जामीन मिळाला आहे. या प्रकरणी आरोपी वकिल सुधा भारव्दाज (sudha bharadwaj) यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

सुधा भारद्वाज यांची अन्य अटीसह जामिनावर मुक्तता

सुधा भारद्वाज ह्यांची 50 हजार रुपयाच्या कॅश security आणि अन्य अटीसह जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने आदेश दिला आहे. सुधा भारद्वाज या व्यावसायिक वकील असून त्या छत्तीसगड मध्ये प्रॅक्टिस करतात. त्यामुळे त्यांना सवलत देण्यात यावी,या मागणीची याचिका दाखल करण्यात आली होती.

मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

ऑर्डरमध्ये लिहिलंय, याचिकाकर्त्या 2 वर्षाहून अधिक काळ तुरुंगवासात आहेत, त्या 60 वर्षांच्या असून छत्तीसगड येथे वकिलीचा व्यावासाय करतात. त्यांना मुंबईत वास्तव्यास ठिकाण नाही. न्यायालयाने हे पाहता याचिकाकर्त्यांना कॅश security वर सोडण्याचे आदेश दिले,

कॅश security वर सोडण्याबाबत सरकारी पक्षाचा आक्षेप आहे त्यांना संशय आहे की, आरोपी पुरव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते , तसेच याचिकाकर्त्यांना महिन्यात एकदा NIA कोर्टात हजर राहण्यासाठी बंधनकारक करावे अशी मागणी कोर्टाकडे केली आहे.

sudha bharadwaj
भीमा कोरेगाव प्रकरण : रश्मी शुक्ला चौकशी आयोगापुढे हजर, पण...

परवानगी शिवाय बाहेर जाता येणार नाही

सुधा यांनी कोर्टाच्या परवानगी शिवाय बाहेर जाता येणार नाही. नातेवाईकांचे राहत्या घराच्या पत्त्यासह माहिती देण्यात यावी. आपली राहती जागा बदलताना कोर्टाला कळवणे गरजेचे आहे. प्रसार माध्यमात या केस संदर्भात कोणताही प्रकारचे वक्तव्य करू नये.गरज असल्यास कोर्टाच्या सुनावणी साठी हजर होण्याचे आदेश सुधा यांनी देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com