NCB योद्धा झाल्यानं मलिकांना मिरची का झोंबली? फ्लेचर पटेल यांचा सवाल

NCB योद्धा झाल्यानं मलिकांना मिरची का झोंबली? फ्लेचर पटेल यांचा सवाल
Summary

फ्लेचर पटेल यांनी लष्करात सेवा बजावली असून ते सध्या फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतात.

एनसीबीने केलेल्या अनेक कारवायांमध्ये फ्लेचर पटेल यांचे नाव असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना अनेक प्रश्न विचारले. तसंच फ्लेचर पटेल यांनी शेअर केलेल्या फोटोत लेडी डॉन कोण? तसंच समीर वानखेडेंच्या पब्लिसिटीचं काम ते का करतात असा प्रश्नही नवाब मलिक यांनी विचारला होता. आता यावर फ्लेचर पटेल यांनी उत्तर दिलं असून एनसीबीचा य़ोद्धा झाल्यानं मिरची का झोंबली असा सवाल त्यांनी केला.

नवाब मलिक यांनी एनसीबीवर आरोप करताना फ्लेचर पटेल यांचे नाव घेतले होते. त्यावर फ्लेचर पटेल यांनी म्हटलं की, आम्ही एनसीबीचे योद्धा झालो तर नवाब मलिकांना का मिरची झोंबली? याआधीही फडणवीस यांनी ड्रग्ज प्रकरण आणि नवाब मलिक यांच्याबद्दल सांगितलं आहे.

माझा नंबर घ्या, कार्यकर्ते आहेत त्यांना सांगा. कोणत्याही सैनिकाला, वर्दीवाल्याचे नाव घेऊ नका. कोणत्याही सैनिकाला त्याच्या सेवेसाठी तुमच्या परवानगीची गरज नाही. तुम्ही ड्रग्ज विरोधात असाल तर खांद्याला खांद्या लावून पुढे या असं आव्हानही फ्लेचर पटेल यांनी दिलं. मी तुमच्याच भागात येऊन सांगतो की कुठं काय काय मिळतं असंही फ्लेचर पटेल यांनी म्हटलं.

NCB योद्धा झाल्यानं मलिकांना मिरची का झोंबली? फ्लेचर पटेल यांचा सवाल
यास्मिन वानखेडे, समीर वानखेडे आणि मनसे कनेक्शन, काय आहे प्रकरण?

कोण आहेत फ्लेचर पटेल?

फ्लेचर पटेल यांनी लष्करात सेवा बजावली असून ते सध्या फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतात. रिया चक्रवर्ती प्रकरणात ते एनसीबीचे पंच होते. भारतीय सैन्य दलात २० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आहे.

फ्लेचर पटेल यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबतचे अनेक फोटो आहेत. सैनिकांच्या कार्यक्रमादरम्यान समीर वानखेडेंसोबत फ्लेचर यांचे फोटो असून त्याचा उल्लेख करत नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com