समीर वानखेडे प्रकरण : फ्लेचर पटेल आणि 'लेडी डॉन' कोण आहे?

sameer wankhede
sameer wankhedeesakal

मुंबई : फ्लेचर पटेल..(flecther patel) लेडी डॉन (lady don) कोण आहे आणि समीर वानखेडेंशी (Sameer Wankhede) काय संबंध ...मंत्री नवाब मलिकांकडून NCB विरोधात आज गौप्यस्फोट करताच राजकिय वर्तुळात खळबळ माजली. फ्लेचर, लेडी डॉन, NCB च्या अधिकाऱ्याबरोबर काय संबंध आहेत असा सवाल मलिकांनी केलाय. त्यांचा रोख NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडे करण्यात आलाय. फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन यांच्यासोबत NCB अधिकारीं समीर वानखेडेंचे विविध फोटो व्हायरल होत असल्यामुळे NCB वर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर मलिकांनी उल्लेख केलेल्या 'लेडी डॉन'चे मनसे नेत्यांसह इतर काही दिग्गज मंडळींसोबत देखील फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता समीर वानखेडे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

3 प्रकरणात फ्लेचर पटेलच पंच कसा ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे NCB ने आर्यन खान याच्याविरूद्ध केलेल्या कारवाईनंतर आक्रमक झाले असून नवाब मलिक आणि एनसीबी यांच्यातील संघर्ष अधिकाधिक तीव्र होत असून मलिक यांनी शनिवारी नवा खुलासा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मलिक यांनी NCB च्या 3 केसचं उदाहरण देत सांगितलं की या तीनही प्रकरणांमध्ये फ्लेचर पटेल नावाची व्यक्त पंच होती. इतरही केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच असू शकतो, मात्र आपल्याला 3 केसेसचा तपशील मिळाला असल्याने तो जाहीर करत असल्याचं मलिक म्हणाले. आता फ्लेचर पटेल.. 'लेडी डॉन'...आणि समीर वानखेडे यांचे कनेक्शन समोर येत असल्याने या वादाला आता नवीनच वळण लागले आहे.

फ्लेचर पटेल आणि 'लेडी डॉन' चा समीर वानखेडेंशी असा आहे संबंध...

फ्लेचर पटेल याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबतचे बरेच फोटो पोस्ट केल्याचे आढळतात. एका सैनिकी सामाजिक कार्यक्रमादरम्यान समीर वानखेडेंसोबत फ्लेचरचे फोटो आढळतात. ज्याचा खुलासा नवाब मलिक यांनी आज केला. फ्लेचर पटेल याने एका महिलेचा एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. ज्याचा उल्लेख नवाब मलिक यांनी आज लेडी डॉन म्हणून केला. आणि या दोघांचा संबंध समीर वानखेडेंशी नेमका काय आहे असा प्रश्नही मलिक यांनी विचारला आहे.

फ्लेचर पटेल सोबत फोटोतली 'लेडी डॉन' कोण? समीर वानखेडेंशी असा आहे संबध..

मलिकांनी यावेळी ज्या लेडी डॉनचा उल्लेख केला आहे. जश्मिन वानखेडे असे महिलेचे नाव असून, पेशाने क्रिमिनल लॉयर असून मुख्य म्हणजे समीर वानखेडे यांच्या बहिण आहेत. फ्लेचरने यास्मीन सोबतचे काही फोटो स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केलेत. त्यात यास्मिनचा उल्लेख त्यांनी ‘लेडी डॉन’ असा केलाय. हे फोटो शेअर करताना फ्लेचरने या क्षणांचा ‘फॅमिली टाईम’ असा उल्लेख केलाय. ही लेडी डॉन नेमकी कोण आहे आणि या लेडी डॉन च्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता का? याची उत्तरही समीर वानखेडेंनी द्यावी अशी मागणी नवाब मलिकांनी केली आहे.

मनसेच्या दिग्गज नेत्यांसोबत फोटो व्हायरल

दरम्यान यास्मिन वानखेडेंच्या सोशल मिडियावर मनसेच्या चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्यासोबतही फोटो पोस्ट करण्यात आले आहे, यास्मीन देखील मनसेच्या चित्रपट सेनेच्या पदाधिकारी असल्याचंही मलिक यांचं म्हणणं आहे. चित्रपटसृष्टीमध्ये फ्लेचर पटेल आणि लेडी डॉनच्या माध्यमातून काय उद्योग सुरू आहे, याचा खुलासा NCB ने केला पाहिजे अशी मागणी मलिक यांनी केली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com