राष्ट्रवादीचा 'तो' फोटो RSS कडून व्हायरल, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वडीलांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आणलेल्या खाऊ वाटपाच्या बॉक्सेसचा वापर करून त्यावर फोटोशॉप करुन ट्रोल करण्याचा प्रयत्न भाजपच्या आयटी सेलने केला होता आणि आता जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा जयंत पाटील या पुरग्रस्तांना मदत करत असलेल्या फोटोचा वापर आरएसएसने आपल्या कार्यकर्त्यांसाठी केल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

मुंबई : सोशल मीडियात फोटो मॉर्फ करून वापरण्याचा आरोप भाजपवर कायम होतात, पण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (आरएसएस) हा आरोप होताना दिसत आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील यांनी मदतकार्यावेळी काढलेला फोटो आरएसएसकडून आपण मदत करत असल्याचे व्हायरल झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वडीलांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आणलेल्या खाऊ वाटपाच्या बॉक्सेसचा वापर करून त्यावर फोटोशॉप करुन ट्रोल करण्याचा प्रयत्न भाजपच्या आयटी सेलने केला होता आणि आता जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा जयंत पाटील या पुरग्रस्तांना मदत करत असलेल्या फोटोचा वापर आरएसएसने आपल्या कार्यकर्त्यांसाठी केल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा जयंत पाटील यांनी पुरग्रस्तांसाठी धावून जात सुमारे 70 हजार पुरग्रस्तांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी बघितली. त्यांच्या या कार्याचा वापर आरएसएस स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचा आरोप होत आहे. सोशल मीडियात याबाबतची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. राष्ट्रवादी आणि आरएसएसच्या वादात नेटीझन्सची मात्र करमणूक होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood affected peoples help photo viral in social media