पूर कोल्हापुरात व्हिडिओ बदलापूरचा; सरकारच्या ट्विटर हँडलवरील प्रकार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्या भागात पुराची तीव्रताही वाढली आहे. कोल्हापुरात महापुराची परिस्थिती असताना मात्र बदलापुरचा व्हिडिओ शासनाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

मुंबई : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्या भागात पुराची तीव्रताही वाढली आहे. कोल्हापुरात महापुराची परिस्थिती असताना मात्र बदलापुरचा व्हिडिओ शासनाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

सांगली, कोल्हापुरातील पुरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी बचाव पथकाकडून प्राधान्य दिले जात आहे. यासाठी नौदल, लष्कर आणि एनडीआरएफचे जवान करत आहेत. एनडीआरएफच्या जवानाने केलेल्या मदतकार्याला दाद देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या ट्विटरवरून एक पोस्ट केली आहे. मात्र, ही पोस्ट करताना चुकीचा व्हिडिओ पोस्ट केला. पूरातून एका माकडाला वाचवल्यानंतरचा एनडीआरएफ जवानाचा एक व्हिडिओ 'महाराष्ट्र माहिती केंद्र'च्या ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र माहिती केंद्राच्या ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ 28 जुलै असून, बदलापूरमधील आहे. व्हिडिओ चुकीचा पोस्ट झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्हिडिओ लगेचच काढून टाकण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood in Kolhapur but video of Badlapur showed on Government Twitter Handle