
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याच्या सीमेवरील गावांमध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे. हातभट्टीबरोबरच विषारी ताडी खुलेआम विकली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे नागणसूर येथील पोलिसांच्या आऊट पोस्टजवळच हातभट्टीबरोबरच विषारी ताडी मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. त्या व्यसनामुळे तरुणांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाल्याचे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
अक्कलकोट तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील बहुतेक गावांमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत हातभट्टी अन् पाण्याच्या बाटलीत विषारी ताडी मिळते. याची पोलिसांनाही माहिती असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. अनेक हॉटेल, चहा कॅन्टिनमध्ये विषारी ताडी व हातभट्टी ‘केटी’ या टोपण नावाने ओळखली जाते. ‘एक केटी दे’ म्हटल्यावर तो विक्रेता ताडीची बाटली काढतो, असे विदारक चित्र आहे. पोलिस म्हणतात, कारवाईसाठी गेल्यावर संशयित आरोपी कर्नाटक हद्दीत जातात. शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी देखील ताडीच्या नादी लागले आहेत.
तरुणांच्या हाताला काम नाही, बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनेकांनी असे अवैध धंदे सुरू केले आहेत. हातभट्टीच्या आहारी गेलेल्या कुटुंबांची स्थिती विदारक झाली असून मुलींचे शिक्षण अर्ध्यातून बंद, बालवयात विवाह असे देखील प्रकार होतात, असे गावकरी सांगतात. हे वास्तव बदलण्यासाठी तेथील आमदार सचिन कल्याणशेट्टी, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी पुढाकार घेतील, अशी गावकऱ्यांना आशा आहे.
अक्कलकोट तालुक्यातील विदारक स्थिती
अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर, नागणसूर, हैद्रा, शिवाजी नगर, वागदरी, दुधनी, मैंदर्गी, तडवळ या गावांमध्ये हातभट्टीची खुलेआम विक्री सुरू आहे. तोळमड्डी तांडा हा हातभट्टी निर्मितीचा अड्डा मानला जातो. नागणसूर येथील पोलिस आऊट पोस्टच्या भिंतीलगत केमिकल मिश्रित दारू विकली जाते, असे गावकरी सांगतात. याशिवाय विषारी पावडरचा वापर करून मोठ्या प्रमाणावर ताडीची देखील विक्री या भागात होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.