आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करा - पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

सत्ताधारी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विषयांना प्राधान्य देऊन या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करा, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या मंत्र्यांना दिले. 

या   वर्षात जिल्हा परिषदांसह आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या माध्यमातून पक्षसंघठन मजबूत करण्याची मोठी संधी आहे. सत्ताधारी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विषयांना प्राधान्य देऊन या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करा, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या मंत्र्यांना दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक शरद पवार यांनी बोलावली होती.  सत्ता राबविताना स्थानिक प्रश्‍नांसह धोरणात्मक निर्णयाला महत्त्व देतानाच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुका कशा लढवता येतील, याबाबत मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घ्या, अशा सूचनादेखील पवार यांनी या वेळी केल्या. बैठकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनां-बाबतदेखील चर्चा करण्यात आली. 

दरम्यान, एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमाबाबत जे पत्र दिले होते, त्याची बैठक झाल्यानंतर दोन तासांच्या आत एनआयएकडे हे तपास प्रकरण वर्ग करण्यात आले. त्याबाबत शरद पवार गंभीर असल्याचेदेखील सांगण्यात येते. या प्रकरणाची राज्य सरकारला समांतर चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी प्रक्रिया पूर्ण करून निर्णय घ्यावा, असेही ठरल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Focus on upcoming elections says sharad Pawar

टॅग्स
टॉपिकस