बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे नीटची तयारी करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर एका लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने बलात्कार केला. यावेळी पीडितेचा व्हिडीओही बनवण्यात आला आणि तेव्हापासून विद्यार्थिनीला सतत ब्लॅकमेल केले जात आहे. त्याचवेळी आरोपीने एके दिवशी विद्यार्थ्यीनीच्या पालकांना व्हिडिओही पाठवला. सध्या पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणाचा शोध सुरू आहे.