‘सार्वजनिक’चा ‘फॉरेन्सिक’ उद्योग

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 जुलै 2018

मुंबई - सहा वर्षांपूर्वी देखभाल व दुरुस्तीची कामे केल्याचे दाखवून काढण्यात आलेली देयके रद्द केल्यानंतर आता पुन्हा नव्याने ही देयके  काढण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू आहे. 

मुंबई - सहा वर्षांपूर्वी देखभाल व दुरुस्तीची कामे केल्याचे दाखवून काढण्यात आलेली देयके रद्द केल्यानंतर आता पुन्हा नव्याने ही देयके  काढण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१२ मध्ये इलाखा शहर, मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई अशा ३ विभागांत १५८ कोटी रुपये खर्चाची देखभाल दुरुस्तीची कामे झाल्याचे दाखवत देयके तयार केली होती. मात्र, ही देयके बोगस असल्याचे आढळून आल्याने ती रद्द केली होती. यातील ९८ कोटींच्या इलाखा शहर विभागतील कामांपैकी १३ मजूर सोसायट्यांच्या नावावरील १ कोटी ९ लाखांच्या कामाच्या देयकाबाबत लोकायुक्‍ताच्या आदेशावरून चौकशी करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन वेळा चौकशी करून हे १ कोटी ९ लाखांचे देयक बोगस असल्याचा अहवाल दिला होता. मात्र, त्यानतंरही काही अधिकाऱ्यांनी या कामाची फॉरेन्सिक चाचणी करून ती कामे वैध ठरवण्याची धावपळ सुरू केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. 

दोन वेळा विभागांतर्गतच्या चौकशीत फोलपणा आढळून आल्यानतंरही सदरील कामाची फॉरेन्सिक चाचणी केल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. त्यातच ज्या १३ मजूर सोसायट्यांच्या नावाने ही देयके काढण्यात आली आहेत, त्या सोसायट्यांनी या देयकाची मागणीच केलेली नाही. 

रद्द केलेली देयके
२०१२ मध्ये इलाखा शहर विभागातील ९८ कोटी, मध्य मुंबई ४० कोटी आणि उत्तर मुंबई विभागातील २० कोटी अशी एकूण १५८ कोटी रुपयांची कामे झाल्याचे दाखवून बिले तयार केली होती. मात्र, प्रत्यक्ष तपासणीत कामे न करताच बिले लिहिल्याचे उघड झाल्याने सर्व बिले रद्द करण्यात आली होती. 

अशी आहे स्थिती...
२०१२ मधील देखभाल दुरुस्तीची कामे 
नव्या सरकारने रद्द केली होती कामे 
१५८ कोटींची कामे; १३ मजूर सोसायट्यांची कामे 

Web Title: forensic industry of public