

Forest Department demolishes farmer house
ESakal
मुरबाड : शाई गावातील अनंत दत्तू भोईर यांच्या राहत्या घरावर बुलडोझर फिरवून वन विभागाने त्यांचे घर शुक्रवारी (ता. २३) जमीनदोस्त केले. ही कारवाई करताना वन विभागाने मानवी हक्क व नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन केले, असा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी मुरबाड तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे. याबाबत उपवनसंरक्षक तुषार काळभोर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता.