आर्यनचा बॉडीगार्ड म्हणून शाहरुखने केली 'या' विश्वासू व्यक्तीची निवड | Aryan Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan khan

आर्यनचा बॉडीगार्ड म्हणून शाहरुखने केली 'या' विश्वासू व्यक्तीची निवड

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यनला Aryan Khan २९ ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला. ३ ऑक्टोबर रोजी त्याला केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अटक केली होती. आर्यन जामिनावर सुटल्यानंतर शाहरुखने त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी पाहता आर्यनसोबत एक बॉडीगार्ड ठेवण्याचा निर्णय शाहरुखने घेतला होता. यासाठी तो कोणाची निवड करेल, याबाबत चर्चा होती. मात्र नवीन व्यक्ती नेमण्यापेक्षा शाहरुखने यासाठी ओळखीतीलच एका विश्वासू व्यक्तीची निवड केली आहे.

आर्यनच्या अटकेमुळे शाहरुखने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सचं शूटिंग थांबवलं होतं. मात्र आता तो पुन्हा स्पेनला चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना होणार आहे. परदेशात जाण्यापूर्वी त्याने आर्यनवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नेहमी त्याच्यासोबत राहण्यासाठी बॉडीगार्डची निवड केली आहे. शाहरुखने त्याचा अत्यंत विश्वासू बॉडीगार्ड रवी सिंगची Ravi Singh या कामासाठी निवड केली आहे. रवी सिंग हा गेल्या अनेक वर्षांपासून शाहरुखसोबत काम करत आहे. त्याच्या कामावर आणि निष्ठेवर किंग खानचा पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच त्याने रवी सिंगची निवड केली आहे.

हेही वाचा: "इतिहासाचं ज्ञान कमी असल्याने अशा लज्जास्पद चुका होऊ शकतात"

आर्यन नव्या व्यक्तीसोबत सहजतेने वावरू शकणार नाही, म्हणूनसुद्धा रवी सिंगची निवड केल्याचं म्हटलं जात आहे. तर आता शाहरुखसाठी नवा बॉडीगार्ड शोधला जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनला १४ अटींवर जामीन मंजूर केला. त्यापैकी एक महत्त्वाची अट म्हणजे त्याला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहावं लागणार आहे.

शाहरुखच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा 'पठाण' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्क्रीन शेअर करणार आहेत. याचसोबत नयनतारासोबत तो 'अटली' या चित्रपटातही झळकणार आहे.

loading image
go to top