
राज्यात मान्सून वेळेआधीच दाखल झाला असून पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच आता पावसामुळे गाडी स्लिप होऊन माजी आमदाराचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं निधन झालं. औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ हा अपघात झाला.