''फडणवीस स्टेजवरचे नट, भाजप तर राणे आणि विखे-पाटील चालवतात''|Devendra Fadnavis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Gawhane on Devendra Fadnavis

''फडणवीस स्टेजवरचे नट, भाजप तर राणे आणि विखे-पाटील चालवतात''

मुंबई : ''राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे स्जेजवरचे नट आहेत. पण, खरा भाजप पक्ष नारायण राणे (Narayan Rane) आणि राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) चालवतात'' असं खळबळजनक व्यक्तव्य आतापर्यंत भाजपचे माजी आमदार आणि नुकतेच राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केलेले विजय गव्हाणे (Vijay Gawhane) यांनी केलं. आज त्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा: मेडीकल कॉलेजसाठी परभणीचे नाव वगळण्याचे कारण काय ? माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे 

''आज माझी घरवापसी झाली आहे. माझी राजकीय मैत्री ही प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंची होती. त्यामुळेच मी भाजपमध्ये गेलो. त्या पक्षात काम केलं. पण, गोपीनाथ मुंडेनंतर आता ही भाजप तशी राहिली नाही. आता भाजपमध्ये बहुजन समाजातील लोकांना जागाच नाही. देवेंद्र फडणवीस हे फक्त स्टेजवरचे नट आहेत. पण खरा पक्ष नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील चालवतात'', असं वक्तव्य विजय गव्हाणे यांनी केलं आहे.

''भाजपमध्ये पंकजाताईंचे हाल'' -

''आमचं राजकारण वेगळे आहे. शाहू-फुले यांचा महाराष्ट्र घडवणार नेता हे फक्त शरद पवार आहेत. भाजपमध्ये पंकजा ताईंचे पण हाल सुरू आहेत. त्या पक्षात का आहेत? हे माहिती नाही. त्याबाबत मी त्यांना विनंती करणार आहे. भाजपचे विचारच यामागील सूत्रधार आहे'', असा आरोपही विजय गव्हाणे यांनी केला आहे.

विजय गव्हाणे कोण आहेत?

विजय गव्हाणे हे परभणीतून भाजपचे आमदार होते. आता त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याची चर्चा आहे. खा फौजिया खान यांनी गव्हाणे यांना पक्षात आणण्यासाठी मोठी मेहनत घेतलीय. आता परभणीत राष्ट्रवादीची पाळेमुळे खोलवर रुजविण्यासाठी गव्हाणे प्रयत्न करताना दिसून येतील.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpDevendra Fadnavis
loading image
go to top