esakal | ठाकरे सरकार 'या' कारणामुळे पडेल, फडणवीसांची भविष्यवाणी
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे सरकार 'या' कारणामुळे पडेल, फडणवीसांची भविष्यवाणी

ठाकरे सरकार 'या' कारणामुळे पडेल, फडणवीसांची भविष्यवाणी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे, करेक्ट कार्यक्रम होईल, अशा वावड्या उडत आहेत. या प्रश्नावर बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध पवित्रा घेत राज्यातील सरकार पडल्यानंतर पर्याय देऊ, असं वक्तव्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली आहे. यामध्ये बोलताना फडणवीस म्हणाले की, 'राज्यातील ठाकरे सरकार अंतरविरोधाने भरलेलं सरकार आहे. देशाच्या इतिहासात अंतरविरोधी सरकार कधीही पाच वर्ष सत्तेत राहू शकलेलं नाही. त्यामुलेळच आता आपण पाहतोय, सरकारचा अंतरविरोध हळूहळू मोकळा व्हायला लागला आहे. सत्तेमुळे हे एकमेंकांना चिपकले असले तरिही सत्ता फारकाळ एकत्र ठेवू शकत नाहीत. प्रत्येकाचे काहीना काही स्वार्थ आहेत. आणि ते मारले गेले की, मग त्या सत्तेमध्येदेखील लोकांना खुर्ची बोचायला लागते. आणि हीच परिस्थिीत सध्या राज्यातील सरकारमध्ये पाहायला मिळतेय. त्यामुळेच आम्ही कुठेही नजर ठेवून बसलेलो नाहीत. हे सरकार अंतरविरोधाने पडेल. ज्यादिवशी हे सरकार पडेल तेव्हा पर्यायी सरकार देऊ. तोपर्यंत सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजप काम करेन.'

राज्य सरकारवर टीका करणाता फडणवीस म्हणाले की, पूरग्रस्त भागातील नागिरिकांचं लवकरात लवकर पुनर्वसन करावे. त्यांना तातडीने मदत करायला हवी. पण सरकार आणि प्रशासन यांच्यात समन्वय असल्याचं दिसत नाही. तळीयेत राज्य सरकारची उदासीनता दिसून आली आहे. दोन वर्षांपासून कोविडचं कारण सांगून महाराष्ट्र थांबवलाय. आता पुन्हा राज्यातील विकासकामांना गती मिळायला हवी.

हेही वाचा: पूरग्रस्तांसोबत फडणवीस जेवले, जाणून घेतल्या व्यथा

उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

राजकीय विरोधक म्हटले की आरोप-प्रत्यारोप आलेच. पण राजकारणाच्या पलीकडे अनेक राजकीय नेत्यांचे एकमेकांशी वैयक्तिक संबंध हे स्नेहाचे असतात. माझे आणि उद्धव ठाकरे यांचेही जिव्हाळ्याचे संबध आहेत, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, 'होय! मी उद्धवजींना फोन करुन शुभेच्छा दिल्या. आम्ही राजकीय विरोधक आहोत आणि ते आत्ता आहोत. मागील 25 वर्षांपासून आम्ही एकमेंकाचे चांगले मित्र आहोत. आता त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. त्यामुळे आम्ही एकमेकांच्यासमोर आहोत. वैयक्तिकरित्या अशी परिस्थिती नाही की, मला त्यांना शुभेच्छा देता येत नाहीत. मी कधीही फोन उचलून त्यांच्याशी बोलू शकतो. राजकारणापलिकेड आमची मैत्री आहे.

हेही वाचा: न्यायाधिशाची हत्या की अपघात? 'तो' व्हिडिओ व्हायरल

केंद्रात जाणार का?

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशी चर्चा सुरु होती? यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात संघर्षाची वेळ असताना दिल्लीत जाऊन काय करु? मी राज्याच्या राजकारणातच राहणार आहे. मला केंद्रात बोलवतील असं वाटत नाही. पण सर्वस्वी निर्णय मोदी यांचा असेल.

हेही वाचा: 'नारायण राणे आमचे नेते आहेत'; पाहा व्हिडिओ

loading image
go to top