esakal | कोरोना लसीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी लावला मोदींना टोला!
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj-Chavan_Narendra-Modi

भारतीय बनावटीची पहिली लस ‘कॅव्हसिन’ ही येत्या स्वातंत्र्यदिनी बाजारात येण्याची शक्‍यता भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाद्वारे (आयसीएमआर) वर्तवण्यात आली आहे.

कोरोना लसीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी लावला मोदींना टोला!

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना-व्हायरसच्या लसीची केंद्र सरकारकडून घाईघाईत केली जाणारी घोषणा म्हणजे मोदींना लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्यासाठीचा हा आटापिटा आहे का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

- युवकांसाठी महत्त्वाची बातमी; आता पुणे झेडपीने सुरू केली 'कमवा व शिका' योजना!

जगभरासह भारतात कोरोनावरील लसीवर संशोधन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता भारतीय बनावटीची पहिली लस ‘कॅव्हसिन’ ही येत्या स्वातंत्र्यदिनी बाजारात येण्याची शक्‍यता भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाद्वारे (आयसीएमआर) वर्तवण्यात आली आहे; मात्र या लसीच्या वैद्यकीय चाचण्या, अन्य वैद्यकीय संशोधन याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. 

- यंदा इंजिनीअरिंगला प्रवेश वाढणार; नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली!

यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मोदींना लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्यासाठीच हा आटापीटा आहे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा