
मागच्या 135 वर्षातील काँग्रेसची भूमिका बदलणे अशक्य; पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : राज्यभर सध्या मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यावरुन वादंग सुरु असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वादंगाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज्यभर सुरु असलेल्या जातीय राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात जे घडत आहे ते दोन्ही बाजूंनी घडतंय, हे फक्त राज्यासाठीचं नाहीतर देशासाठी हानिकारक आहे. जातीयवादी राजकारण करून निवडणुका जिंकण्याचं काम सध्या देशात सुरु आहे त्यामुळे देशाचं नुकसान होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील भाजपाच्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले, भाजपाचं कमळ ऑपरेशन इथे चालणार नाही, राज्यात भाजपाचं धार्मिक द्वेषाचं राजकारण सध्या सुरू असून अचानक लोकांना हनुमान आणि इतर गोष्टी आठवायला लागल्या आहेत. राजकीय लढाई घटनात्मक पद्धतीने लढवायला पाहिजे असं ते बोलताना म्हणाले.
हेही वाचा: प्रियांका गांधींनी 2 कोटीचं चित्र विकत घ्यायला भाग पाडलं; कपूर यांचा खुलासा
देशात सध्या असहिष्णुता पसरत असून हे वातावरण कोण पसरवत आहे? या गोष्टीला कुणाचा पाठिंबा आहे का? असा सवाल करत त्यांनी या गोष्टीचा निषेध केला आहे. तसेच काल मुंबईत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर बोलताना ते म्हणाले की, कुणाच्याही गाडीवर हल्ला होणं चुकीचं आहे, तसेच राणा दाम्पत्यांनी सुव्यवस्था बिघडवली आहे तर त्यांच्यावर पोलिस कारवाई करतील. तसेच भाजपाने सध्या जे हिंदुत्वाचं राजकारण देशभर चालवलं आहे तर फडणवीस यांना अखंड भारताचा कार्यक्रम राबवू द्या. त्यांनी जर आम्हाला रुपरेषा सांगितली तर आमच्या बुद्धीत देखील भर पडेल असं ते बोलताना म्हणाले.
दरम्यान या प्रकरणावर काँग्रेसची भूमिका कायम राहणार आहे. मागच्या १३५ वर्षात कॉंग्रेसने जी भूमिका घेतली आहे ती बदलणं शक्य नाही असं ते बोलताना म्हणाले.
Web Title: Former Cm Prithviraj Chavan Loudspeaker Hanuman Chalisa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..