
राज्यातील कांदा उत्पादकांना योग्य भाव मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. कांदा मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या भुजबळांनी विधानसभेत थेट एकनाथ शिंदे यांचं नाव घेत कांदा प्रश्नी तोडगा काढण्यासाठी दिल्लीत केंद्र सरकारशी चर्चा करा असं आवाहन केलंय. भुजबळांनी म्हटलं की, कांद्यावर बांगलादेशने १० टक्के आयात कर आणि यांनी २० टक्के निर्यात कर लावला. या ३० टक्क्यांमुळे आतंरराष्ट्रीय व्पापारात आपले उत्पादक टिकत नाहीत. आपण त्वरीत केंद्र सरकारला सांगायला हवं, २० टक्के निर्यात कर हटवावं. एकनाथ शिंदेंनी हे जाऊन दिल्लीत सांगितलं पाहिजे.