मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होताच येडियुरप्पांना आणखी एक धक्का

उच्च न्यायालयाचे समन्स, पुत्र विजयेंद्रसह हजर राहण्याचे आदेश
Increase Problem for Karnataka Cm bs Yeddyurappa
Increase Problem for Karnataka Cm bs Yeddyurappa
Updated on

बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (CM Yeddyurappa) यांच्या कुटुंबाला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आणखी एक धक्का बसला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) येडियुराप्पा आणि त्यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह अनेकांना मंगळवारी नोटीस बजावली होती. तथापि, उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ५) समन्स जारी केले असून सर्वांना १७ ऑगस्ट रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहाण्याची सूचना केली.

सामाजिक कार्यकर्ते टी. जे. अब्राहम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने समन्स जारी केले आहे. येडियुरप्पा यांचे नातू शशिधर मराडी, मुलगी पद्मावती, जावई विरुपाक्षप्पा यमकनमरडी, नातेवाईक संजय श्री, मंत्री एस. टी. सोमशेखर, आयएएस अधिकारी जी. सी. प्रकाश, के. रवी, उद्योजक चंद्रकांत रामलिंगम यांना उच्च न्यायालयाच्या एक सदस्य पीठाने नोटीस बजावली होती.

Increase Problem for Karnataka Cm bs Yeddyurappa
मुलगी जन्माला आली पाहिजे ; रेवंतचा देशभ्रमंतीतून संदेश

बंगळूर विकास प्राधिकरण (बीडीए) गृहनिर्माण योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाच दिल्याचा आरोप करत टी. जे. अब्राहम यांनी विशेष न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. त्यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. पण येडियुरप्पा मुख्यमंत्री असल्याने त्यांच्यावर खटला चालविण्यासाठी त्यांना राज्यपालांची परवानगी आवश्यक होती. राज्यपालांनी एसीबीच्या सुनावणीला परवानगी देण्यास नकार दिला. आता येडियुराप्पा यांनी पद सोडले असल्याने अब्राहम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यांच्या खटल्याला राज्यपालांची परवानगी आवश्यक नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

BBA, BMS, BBM and Integrated MBA 2026-27: First CAP Round offers admission opportunities to 12,282 students
Latest Marathi News Live Update
MPSC Exam
Maharashtra Teacher Recruitment 2026: Pavitra Portal priority selection deadline extended to August 13
Marathi News Esakal
www.esakal.com