राज्य बॅंकेच्या ठेवी 13 हजार कोटींच्या, 25 हजार कोटींचा गैरव्यवहार कसा ? 

सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

मुंबई - राज्य बॅंकेच्या ठेवी 13 हजार कोटींपर्यंत असतील, तर 25 हजार कोटींचा गैरव्यवहार कसा होतो, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राज्य बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार यांच्या अन्य नेत्यांवर सक्‍तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या गुन्हासंदर्भात माध्यमांशी ते बोलत होते. 

मुंबई - राज्य बॅंकेच्या ठेवी 13 हजार कोटींपर्यंत असतील, तर 25 हजार कोटींचा गैरव्यवहार कसा होतो, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राज्य बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार यांच्या अन्य नेत्यांवर सक्‍तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या गुन्हासंदर्भात माध्यमांशी ते बोलत होते. 

शिखर बॅंक गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह सत्तर जणांवर ईडीकडून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणात गुन्हा दाखल झालेले अजित पवार यांनी बाजू मांडली आहे. जर बॅंकेत 25 हजार कोटींचा गैरव्यवहार झालेला असेल, तर ती बॅंक अडीचशे ते तीनशे कोटींचा नफा कशी कमावते, असा उलट सवाल अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार म्हणाले, शिखर बॅंकेच्या कोणत्याही पदावर शरद पवार नव्हते. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माध्यमातून वृत्त आल्यानंतरच शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मला कोणावरही आरोप करायचा नाही. यंत्रणांना तपास करण्याचा अधिकार आहे. त्यांनी खुशाल चौकशी करावी. पण ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना म्हणणे मांडायला वेळ द्यायला हवा, असे अजित पवार म्हणाले. 

बॅंकेच्या कारभारात राष्ट्रवादीसह कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, शेतकरी कामगार पक्ष अशा सर्वच पक्षांचे नेते आहेत. आरोप असलेले 70 लोक खोटे बोलणार नाहीत. शिखर बॅंकेत 12 ते 13 हजार कोटींच्या ठेवी आहेत. जर ठेवी 13 हजार कोटींपर्यंत असतील, तर 25 हजार कोटींचा गैरव्यवहार कसा होतो. गैरव्यवहारानंतरही बॅंक 250 ते 300 कोटींचा नफा कशी कमावते आहे. 
अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Deputy Chief Minister Ajit Pawar reaction on Shikhar bank money laundering case