Anil Deshmukh:'मोदी राजकीय सोय बघून वक्तव्य करतात', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर अनिल देशमुखांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय सोय बघून वक्तव्ये करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा आरोप, राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.
Anil Deshmukh
Anil Deshmukhesakal

Sharad Pawar:शरद पवारांना शेतकऱ्यांचे देवदूत म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका बदलवून त्यांनी काहीच केले नसल्याचा आरोप केला. यावर ते राजकीय सोय बघून वक्तव्ये करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा आरोप, राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिर्डी येथे आपल्या भाषणात केंद्रीय कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नसल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते. मात्र याच मोदींनी २०११ मध्ये एका मुलाखतीत शरद पवार यांची सगळी पावले शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेने असतात असे सांगितले होते. आता निवडणूक जवळ आल्याने ते प्रत्येक गोष्टीचे राजकारण करीत असल्याचे देशमुख म्हणाले.

भारताला अगोदर विदेशातून अन्नधान्य आयात करावे लागत होते. शरद पवार यांच्यामुळे आपला देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला आहे. ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी त्यांनी शेतकऱ्यांना मिळवून दिली.

गोसेखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाची मान्यता मिळवून दिली, मोदी भाषण करीत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मंचावर उपस्थित होते. त्यांना पवारांचे कार्य ठावूक आहे. त्यामुळे लगेच हस्तक्षेप करून अजित पवार यांनी मोदी यांच्या वक्तव्याची दुरुस्ती करणे अपेक्षित होते, असेही देशमुख म्हणाले.

फडणविसांनी उत्तर द्यावे

ड्रगमाफिया ललित पाटील नऊ महिने ससून इस्पितळात पोलिसांच्या संरक्षणात होता. अधिष्ठात्यांच्या आदेशाशिवाय इतके दिवस कोणाला ठेवता येत नाही. त्यामुळे वरून कोणाचे आदेश होते, याचे उत्तर गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे. अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Anil Deshmukh
US Shooting : लेविस्टनमध्ये 22 जणांची हत्या करणाऱ्या संशयिताचा मृतदेह सापडला, पोलिसांना वेगळाच संशय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com