१८ वर्षांनंतर माजी आमदार निर्दोष! रविकांत पाटील यांच्या वाढदिवसादिवशी‌ त्यावेळचे पोलिस आयुक्त अशोक कामटे यांच्यासोबत झाली होती वादावादी

तत्कालीन पोलिस आयुक्त अशोक कामटे यांना सात रस्ता परिसरातील बंगल्यात मध्यरात्री बेकायदेशीरपणे घुसून मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार रविकांत शंकरेप्पा पाटील यांच्याविरुद्ध १६ ऑगस्ट २००७ रोजी गुन्हा दाखल झाला होता. असे बोलले जाते की, त्यावेळी कामटे यांनी आमदाराला धरून फरफटत पोलिस ठाण्यात नेले होते.
x cp solapur ashok kamate

x cp solapur ashok kamate

sakal

Updated on

सोलापूर : तत्कालीन पोलिस आयुक्त अशोक कामटे यांना सात रस्ता परिसरातील बंगल्यात मध्यरात्री बेकायदेशीरपणे घुसून मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार रविकांत शंकरेप्पा पाटील यांच्याविरुद्ध १६ ऑगस्ट २००७ रोजी गुन्हा दाखल झाला होता. तब्बल १८ वर्षांनंतर पाटील यांच्यासह सात जणांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

१६ ऑगस्ट २००७ रोजी माजी आमदार रविकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सात रस्ता परिसरातील त्यांच्या बंगल्यासमोर त्यांचे समर्थक रात्री बाराच्या सुमारास फटाके वाजवून जल्लोष करीत होते. त्यावेळी गस्त घालणारे सदर बझार पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश भोसले, पोलिस निरीक्षक श्रीरंग कुलकर्णी, उपनिरीक्षक बाबासाहेब कुलकर्णी त्याठिकाणी आले. समजावून सांगत असताना गोंधळ सुरू होता. त्यावेळी वायरलेसवरून संदेश प्राप्त झाल्याने कामटे, उपायुक्त लक्ष्मण भोसले, पोलिस निरीक्षक शहाजी नरसुडे तेथे गेले. त्यानंतर रविकांत पाटील यांनी ‘मी आमदार आहे, ते माझे कार्यकर्ते आहेत, त्यांना फटाके वाजवू द्या, ताब्यात घेवू नका’ असे म्हणून हरकत घेतली. त्यावेळी पोलिस कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना पाटील हे कामटे यांच्या अंगावर गेले आणि धक्काबुक्की केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

कार्यकर्त्यांना अटक करतेवेळी मज्जाव करून त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी फिर्याद त्यांच्याविरुद्ध दाखल झाली. त्यावरून माजी आमदार पाटील यांच्यासह उदय शंकर पाटील, गणेश कटारे, राम खांडेकर, श्रीशैल खंदारे, मल्लिनाथ निरगुडे, सदाशिव मस्के, कल्लाप्पा वाघमारे, जब्बार शेख, बाळासाहेब घुले यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला होता.

ॲड. थोबडे यांच्या युक्तिवादामुळे फिरला निकाल

गुन्ह्यात सरकारतर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी संशयितांतर्फे अॅड. मिलिंद थोबडे यांनी घटनेवेळी पोलिसांनी बेकायदेशीरपणे रविकांत पाटील यांच्या घरात मध्यरात्री प्रवेश करून गोंधळ घालून धक्काबुक्की करून त्यांना जखमी केले. ते आमदार असल्याने पोलिसांच्या बेकायदेशीर कारवाईवर आक्षेप घेऊन पोलिसांवर कारवाई करतील म्हणून त्यांच्याविरुद्ध खोट्या आशयाची फिर्याद दिली. गुन्ह्यात लावलेल्या कलमांची गृहीतके सरकार पक्षाला शाबीत करण्यात आली नसल्याचे सांगून ॲड. थोबडे यांनी त्यापृष्ठर्थ्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. तो युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांनी रविकांत पाटलांसह सात जणांची निर्दोष मुक्तता केली. यात संशयितांतर्फे ॲड. थोबडे, ॲड. राजकुमार मात्रे, ॲड. व्ही. डी. फताटे, ॲड. विक्रांत फताटे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com