आमचा देव मंदिरातच योग्य होता, पण त्याला बाहेर काढलं गेलं : राजेश क्षीरसागर

Rajesh Kshirsagar Uddhav Thackeray
Rajesh Kshirsagar Uddhav Thackerayesakal
Summary

'मला खात्री आहे, राज्यातील शिवसैनिक आम्हाला गद्दार म्हणणार नाहीत.'

Maharashtra Politics : काल एकनाथ शिंदे सरकारनं (Eknath Shinde Government) आपली दुसरी परीक्षाही पास केलीय. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारलीय. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केलीय. दरम्यान, विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर बंडखोर नेत्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना क्षीरसागर यांनी आपलं मत मांडलंय. ‘मातोश्री (Matoshri) हे आमचं मंदिर आहे. आमचा देव (उद्धव ठाकरे) मंदिरात होता, तेच योग्य होतं, त्याला बाहेर काढलं गेलंय,’ अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी उद्वव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Rajesh Kshirsagar Uddhav Thackeray
हिंदू देवतांचे फोटो असलेल्या कागदातून चिकनची विक्री; तालिब हुसेनला अटक

क्षीरसागर पुढं म्हणाले, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे माझे जुने सहकारी आहेत. मधल्या २०१४ ते १९ दरम्यान काही मतभेद झाले होते, त्यामुळं आज मी मन मोकळं करायला त्यांना भेटलो. एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र आहेत. शिवसेना आणि भाजप वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मातोश्री आमचं मंदिर असून एकनाथ शिंदे हे संकटमोचक आहेत. उद्धव ठाकरे यांना 20१६ ते १७ पासून युवा सेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून दाखवलं गेलं. पण, आमचा देव मंदिरात होता, तेच योग्य होतं. त्याला बाहेर काढलं गेलं. पण, दर १० ते १५ वर्षांनी शिवसेनेमध्ये अशी परिस्थिती येते, ती कशामुळे येते, याचा विचार व्हावा. मला खात्री आहे, राज्यातील शिवसैनिक आम्हाला गद्दार म्हणणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

Rajesh Kshirsagar Uddhav Thackeray
Kandivali Double Murder : मुक्ती मिळणार नाही म्हणून लग्न, तपासात धक्कादायक खुलासे

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत जेव्हा शिवसेना-भाजप युती तुटली, तेव्हा सुभाष देसाई पराभूत झाले होते. त्यानंतरही त्यांना मंत्री करण्यात आलं होतं. मलादेखील कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. मला जर काही जबाबदारी मिळाली तर नक्कीच चांगलं काम करेन. माझ्यासारख्या अनुभवी नेत्याचा वापर केला, तर नक्की फायदा होईल. पण, तो निर्णय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com