आषाढी एकादशीसाठी यंदा  चार हजार एसटी बसगाड्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

सोलापूर - श्री क्षेत्र पंढरपूर येथे येत्या २३ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन विभागाने तीन हजार ७८१ एसटी बसेसचे नियोजन केले आहे.

सोलापूर - श्री क्षेत्र पंढरपूर येथे येत्या २३ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन विभागाने तीन हजार ७८१ एसटी बसेसचे नियोजन केले आहे.

आषाढी एकादशीसाठी मराठवाडा, खानदेशासह पश्‍चिम महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरला येतात. त्यामुळे या वर्षी राज्य परिवहन मंडळाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी २१ ते २८ जुलै या दरम्यान विशेष एसटी गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यासाठी सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. पंढरपूरसह सोलापूर आगारातून विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी बसस्थानकांवर पिण्याचे पाणी, विद्युत सेवा, फिरती स्वच्छतागृहे, उपाहारगृहे, रुग्णवाहिका, चौकशी कक्ष, संगणकीय उद्‌घोषणा कक्ष अशा सुविधा करण्यात येणार आहेत. दिवसेंदिवस पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी वाढतच आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा सोलापूर विभागातून सुमारे २५० एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे.

Web Title: four thousand ST buses for Ashadhi Ekadashi