चार वर्षांच्या मुलीवर वृद्धाकडून बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

शहरातील स्टेशन रस्ता परिसरात चॉकलेटचे आमिष दाखवून 75 वर्षीय व्यक्तीने चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वृद्धाविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ऍट्रॉसिटी), बाललैंगिक अत्याचार कायदा व बलात्काराचा गुन्हा काल रात्री दाखल केला. दादाभाऊ शेंडगे (वय 75) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्यास अटक केली आहे. 

श्रीगोंदे : शहरातील स्टेशन रस्ता परिसरात चॉकलेटचे आमिष दाखवून 75 वर्षीय व्यक्तीने चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वृद्धाविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ऍट्रॉसिटी), बाललैंगिक अत्याचार कायदा व बलात्काराचा गुन्हा काल रात्री दाखल केला. दादाभाऊ शेंडगे (वय 75) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्यास अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे नगर तालुक्‍यातील एक कुटुंब कामानिमित्त शहरात आले होते. स्टेशन रस्त्यालगत आरोपीच्या शेतात ते मजुरी करते. पीडित मुलीचे आई-वडील नातेवाइकांसह 31 मे रोजी दुपारी शेतात कामासाठी गेले होते. मुले घरी खेळत होती. आरोपी शेंडगे याने सायंकाळी चार वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी नेले. नातेवाईक महिला सायंकाळी साडेसहा वाजता मुलीला शोधत शेंडगे याच्या घरी गेली तेव्हा हा प्रकार समोर आला. 

Web Title: Four-year-old girl raped by elderly woman