धक्कादायक! जीसएटी घोटाळ्यामध्ये तब्बल ५०० कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश; जळगाव, मुंबई आणि पुण्यातील सूत्रधारांना अटक 

fraud racket of 500 crore caught in GST fraud in Nagpur
fraud racket of 500 crore caught in GST fraud in Nagpur
Updated on

नागपूर : नागपूर झोनल युनिटकडून बनावट इनव्हॉईस करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. यामध्ये अस्तित्वात नसलेल्या फर्मकडून जवळपास ५०० करोड रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून याचे सूत्रधार जळगाव, मुंबई आणि पुण्यामधील असून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

बनावट पावत्यांविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून, नागपूर परिमंडळ विभागाच्या नाशिक क्षेत्रीय युनिटच्या डीजीजीआयच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रभरातील अनेक व्यवसायांची कसून चौकशी केली.  यामध्ये जीएसटीची नोंदणी मिळविलेले अनेक फर्म हे अस्तित्वात नसून बनावट जीएसटीच्या पावत्या तयार करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आल्याचे आढळून आले. 

तपासादरम्यान पकडलेल्या व्यक्तींच्या चौकशीत या रॅकेटच्या मागे जळगाव येथील एक मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. त्याने या बनावट फर्म चालविण्यासाठी एका व्यक्तीचे बँकेचे डिटेल्स आणि पॅन क्रमांक मिळविण्याचे काम केले होते. तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक आणि इमेल आयडी देखील या फर्म चालविण्यासाठी वापरण्यात आले होते. 

सूत्रांच्या मदतीने मुख्य आरोपीचा शोध घेतला आणि त्याच्या मूळ घरी पोहोचून तपासणी केली असता अस्तित्वात नसलेल्या फर्मसंबंधी कागदपत्रे सापडली नाहीत. दरम्यान, त्याने ती कागदपत्रे जाळल्याचे चौकशीमध्ये समोर आले. तसेच तो स्वतः मालक असलेली एक बनावट फर्म सोडून त्याने मुंबई, पुणे आणि जळगावात आणखी अशाच १७ बनावट फर्म तयार केल्या होत्या. 

या १८ फर्मने तब्बल ५०० कोटी रुपयांचे बँकेचे खोटे व्यवहार केले. तसेच कुठल्याही माल किंवा सेवेचा पुरवठा केला नाही आणि पावतीही देण्यात आली नाही. त्यांच्याकडून तब्बल साडे ४६ कोटींच्या खोट्या टॅक्सच्या पावत्याही जप्त करण्यात आल्या.दरम्यान, या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्या सूत्रधाराला ५ मार्चला अटक करण्यात आली असून १९ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com