राज्यातील जनतेला मोफत विजेचा दिलासा?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या धर्तीवर अन्न, वस्त्र व निवाऱ्याप्रमाणेच विजेचा लाभ सर्वांना घेता यावा, आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही विजेपासून वंचित राहू नये म्हणून १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यास राज्य सरकार प्रयत्नशील आहे. शक्‍य झाल्यास भविष्यात हा आकडा २०० युनिटपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

मुंबई - दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या धर्तीवर अन्न, वस्त्र व निवाऱ्याप्रमाणेच विजेचा लाभ सर्वांना घेता यावा, आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही विजेपासून वंचित राहू नये म्हणून १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यास राज्य सरकार प्रयत्नशील आहे. शक्‍य झाल्यास भविष्यात हा आकडा २०० युनिटपर्यंत वाढवण्यात येणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली असून, त्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऊर्जामंत्री राऊत यांनी नुकतीच वीजग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्यात पाच हजार ९२७ कोटी रुपयांच्या वीजदरवाढीचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाला दिला असून, यावर सुनावणी झाल्यानंतर ‘एमईआरसी’ निर्णय घेणार आहे. हा निर्णय झाल्यानंतर वीजग्राहकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील सरकारने २०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणेच राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free electricity supply to the people of the state