'वानखेडेंनी दफनविधीवेळी आईचा मुस्लिम धर्म दाखवला पण बीएमसीत मृत्यूची नोंद हिंदू म्हणून...' | Sameer wankhede | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sameer wankhede-nawab malik

'समीर वानखेडेंनी दफनविधीवेळी आईचा मुस्लिम धर्म दाखवला'

sakal_logo
By
रश्मी पुराणिक

मुंबई: "धर्म बदलण्यासाठी (Religion) प्रतिज्ञापत्र उपयोगी नसते. त्यासाठी गॅझेट करावे लागते. त्यांनी हे काही केले नाही. संपूर्ण कुटुंबाने आपली दुहेरी ओळख ठेवली. वडील दाऊद, ज्ञानदेव अशी दुहेरी ओळख. बहिणीनीनेही तेच केले. समीरनेही (Sameer wankhede) दुहेरी ओळख ठेवली. समीरने बोगस दाखल्यांचा आधारे मागासवर्गीय प्रमाणपत्र घेतले आणि नोकरी मिळवली" असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते नवाब मलिक (Nawab malik) यांनी केला आहे.

"त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर ओशिवरा दफनभूमीत दफनविधी करण्यात आला, तिथे आईच्या धर्माचा उल्लेख १४ एप्रिल २०१५ रोजी मुस्लिम म्हणून केला. पण दुसर्‍या दिवशी महापालिकेत मृत्यूची नोंद करताना हिंदू अशी केली. आईच्या मृत्यूनंतरही त्याने आईबाबत असा बोगसपणा केला" अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

हेही वाचा: अब तक थ्री नॉट थ्री! गावसकरांकडून अय्यरला मिळाली टेस्ट कॅप

"परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप केला. आरोप लावणारा फरार झाला. याबाबत अनिल देशमुख कायदेशीर लढाई लढतायत. पण आरोप लावणारा मे महिन्यापासून फरार होता" असे नवाब मलिक म्हणाले. त्यांच्याविरोधात चार खंडणीचे गुन्हे दाखल आहेत

हेही वाचा: शक्ती मिल बलात्कार प्रकरण: आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

"महाराष्ट्र सरकारने त्यांना फरार घोषित केल्यानंतर ते परतले आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी सांगितले आपल्याला मुंबई पोलीसांपासून धोका आहे, हे आश्चर्यकारक आहे. तिथे त्यांनी अटकेपासून संरक्षण मागितले आहे. पण परमबीर यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होईल" असे नवाब मलिक म्हणाले.

loading image
go to top