राज्य सरकार इंधन दरात कपात करणार? उपमुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य सरकार इंधन दरात कपात करणार? उपमुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
राज्य सरकार इंधन दरात कपात करणार? उपमुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

राज्य सरकार इंधन दरात कपात करणार? उपमुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

sakal_logo
By
सुधीर काकडे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिलेल्या एका माहितीमुळे अनेकांचा भ्रमनिरास होऊ शकतो. केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वी उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या होत्या. त्यानंतर केंद्राने राज्यांनाही कर कमी करण्याची विनंती केली होती. अनेक राज्यांनी कर कपात करून पेट्रोल डिझेलचे भाव आणखी कमी केले आहेत. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबद्दल प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. पंढपुरमध्ये असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन

राज्याकडे उत्पन्नाच दुसरं साधन नाही, असे म्हणत मुख्यमंत्री अजित पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील दरात कपात होईल अशी आशा असलेल्या राज्यातील नारगिकांचा भ्रमनिरास केला आहे. सरकार सध्या तरी कर कपातीचा विचार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं आहे. येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे झाल्यास, किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा: स्वातंत्र्यसैनिक आजी कंगनावर संतापल्या; PM मोदींना केलं आवाहन

दरम्यान, कार्तिकी एकादशीनिमित्त सोमवारी पहाटे श्री विठ्ठल- रुक्‍मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. हाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्‍मिणी मातेची षोडशोपचार पूजा करण्यात आली.

loading image
go to top