राज्यातील नऊ जिल्ह्यांत इंधन टंंचाईचे सावट!

रिपब्लिकन टँकर चालक व वाहन युनियनच्या टँकर चालकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या इशाऱ्यानुसार आजपासून संप पुकारला
पेट्रोल
पेट्रोल सकाळ

बाळापूर (जि. अकोला) : अकोला ते निंबा फाटा मार्गावर दहा-पंधरा फुट आकाराचे मोठ मोठे खड्डे पडले असून, या रस्त्यांबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने गायगाव डेपोच्या सर्व एक हजार ८०० इंधन टँकर वाहतूकदारांनी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या संपाचा परिणाम राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील पेट्रोल पंपांवर होणार असून, इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

रिपब्लिकन टँकर चालक व वाहन युनियनच्या टँकर चालकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या इशाऱ्यानुसार आजपासून हा संप पुकारला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही रस्ता दुरुस्त होत नसल्याने टँकर चालकांनी संप पुकारण्याचा पावित्रा घेतला आहे.

पेट्रोल
PM मोदींकडून कमला हॅरिस यांना खास भेट; दिली आजोबांशी निगडीत आठवण देखील

बाळापूर तालुक्यातील गायगाव येथे हिन्दुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम व इन्डियन ऑईल पेट्रोलियम या तीन इंधन कंपन्यांचे डेपो आहेत. या डेपोतून आठशे टँकरद्वारे इंधनाचा पुरवठा केला जातो.

मात्र, अकोला-निंबा फाटा दरम्यान रस्त्याचे काम ठप्प असून या रस्त्याची चाळणी झाली आहे. ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. खड्ड्यांमुळे टँकर उलटण्याची दाट शक्यता असून यामध्ये जीवितहानी होण्याचे नाकारता येत नसल्याने टँकर चालकांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास टँकर चालक-वाहकांनी संप पुकारला आहे.

पेट्रोल
'अशा' पद्धतीने सुरु होत आहेत राज्यातील शाळा; वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

या संपात अठराशे चालक-वाहक सहभागी असल्याचे युनियनचे अध्यक्ष फिरोजखान रहीम खान उर्फ राजू लिडर यांनी सांगितले आहे. यावेळी टँकर चालक - वाहकांनी जोपर्यंत रस्ते होत नाहीत तो पर्यंत पेट्रोल मिळणार नाही अशा घोषणा दिल्या. संपा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उरळ ठाणेदार अनंत वडतकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. \

नऊ जिल्ह्यांतील इंधन पुरवठ्यावर होणार परिणाम

गायगाव येथील इंधन ऑईल कंपनीच्या डेपोतील टँकर चालक व मालकांनी शुक्रवारपासून सुरू केलेल्या संपामुळे इंधन वाहतूक ठप्प झाली आहे. या संपावर तोडगा न निघाल्यास हा संप कायम राहण्याची शक्यता आहे. हिन्दुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम व इन्डियन ऑईल पेट्रोलियम कंपनीच्या गायगाव येथील डेपोमधून राज्याच्या वाशीम, अकोला, अमरावती, बुलडाणा, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील विविध भागात टँकरव्दारे इंधन पुरवठा केला जातो. मात्र रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याने टँकर चालविताना जीव मुठीत धरून टँकर चालवावे लागत असल्याने टँकर चालकांमध्ये नाराजी मिर्माण झाली. चालकांनी संप पुकारल्याने याचा परिणाम राज्यातील नऊ जिल्ह्यातील इंधन पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे.

"रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशात टँकर चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे. टँकरमध्ये ज्वलनशील घटक आहेत. टँकर उलटल्यास जिविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत रस्ते होत नाहीत तो पर्यंत पेट्रोल मिळणार नाही व मागणी मान्य न झाल्यास हा संप पुढे सुरूच राहणार आहे."

- फिरोजखान रहिम खान उर्फ राजू लिडर, ट्रक-टँकर ड्रायव्हर, क्लिनर युनियन अध्यक्ष, गायगाव डेपो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com