Social Media: 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय'! भावी आमदार, खासदार खाऊ लागले भाव

तरुणांनो, सोशल मीडियाचा करा जपून वापर
Social Media
Social MediaEsakal

सध्या राज्यात एकीकडे ‘भावी मुख्यमंत्री’ असे पोस्टर वेगवेगळ्या ठिकाणी झळकू लागले आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावरही ‘भावी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, सरपंच’ अशी भावी नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. नेत्यांच्या नावापुढे कार्यकर्ते ‘भावी आमदार’ अशी उपमा देऊ लागल्याने नेत्यांनाही आमदार झाल्यासारखे वाटू लागले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून नकारात्मकता व भावना भडकावणारे मेसेज वाढल्याने तरुणांनी सोशल मीडियाचा वापर जरा जपूनच केला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर सध्या सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत आहे. राजकीय क्षेत्रही याला अपवाद नाही. व्हॉट्सॲप, फेसबुक व इतर सोशल मीडियाचा वापर सध्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रसार व प्रचारासाठी करीत आहेत. सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सांगोला चर्चेच्या यशोशिखरावर आहे. ‘काय झाडी, काय डोंगार...’ हा आमदार शहाजीबापूंचा अस्सल माणदेशी बोलीभाषेतील डायलॉग मोठ्या प्रमाणात गाजत आहे. शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्यासोबत असणारे तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या समर्थनार्थ व विरोधात वेगवेगळे कमेंट सतत सुरू असतात. सोशल मीडियावर हे कमेंट करताना अनेकजण त्यांच्या विरोधात असणाऱ्यांना ‘आमचे भावी आमदार’ असाच उल्लेख करीत असतात. अनेकजण आपल्या नेत्याचा फोटो सोशल मीडियावर ठेवून उघडपणे ‘भावी आमदार’ असा उल्लेख करतात.

तालुक्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तीच्या व गटाच्या राजकारणावर भर दिला जात आहे. पक्षापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ होत असल्याचे सध्याच्या राजकारणातून दिसून येत आहे. त्यामुळे आपलाच नेता कसा श्रेष्ठ आहे किंवा ‘हेच’ भावी आमदार, नगराध्यक्ष, सरपंच होणार असल्याचे ते उघडपणे कमेंट्समधून दाखवतात. सध्याच्या वातावरणात सोशल मीडियावर असे ‘भावी’ ‘भाव’ खाऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Social Media
Amit Shah: मुंबईतील ताकदीबाबत भाजपला आत्मविश्वास; CM शिंदेंच्या बळाचाही शहांकडून आढावा

समाजकारणासाठी तरुणांनी राजकारणात यावे

आजकालच्या राजकारणाची परिस्थिती पाहता, सुशिक्षित तरुण राजकारणापासून दुरावला जात आहे. अनेकजण आपल्या स्वार्थीपणामुळे राजकारणातील कुठल्याही पक्षाशी, गटाशी संबंध ठेवताना दिसत आहेत. परंतु राजकारणातील गढूळपणा काढून राजकारण समाजकारण कसे आहे ते दाखवण्यासाठी, दुसऱ्यांचा उदो-उदो करण्यापेक्षा स्वतःच राजकारणात सामील होऊन तरुणांनी समाजकारण केले पाहिजे. सर्वत्रच राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी उच्चशिक्षित तरुणांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Social Media
Sharad Pawar: शरद पवारांसह राष्ट्रवादीचं वऱ्हाड रविवारी सोलापुरात

उच्च ध्येय बाळगा, परंतु कोणासाठी?

जीवनात निश्चितपणे ध्येय मोठे असले पाहिजे. परंतु, सध्याच्या राजकीय परिस्थितीत ‘कोण’, ‘कोणासाठी’ व ‘का’ या प्रश्नांचे आत्मचिंतन या उपाधी देणाऱ्यांना जरूर केले पाहिजे. उच्च ध्येय निश्चितपणे असावे, परंतु प्रत्येकाने प्रत्येकाचे ध्येय निश्चित केले पाहिजे. उगीचच दुसऱ्याचे उच्च ध्येय बाळगून स्वतः कोणतेच कर्तृत्व न करता फक्त सोशल मीडियावर कमेंट करणे बरोबर नाही.

Social Media
Nana Patole: भावी मुख्यमंत्री पदाच्या NCPच्या दाव्यावर नाना पटोले संतापले; दिला इशारा

राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो

राजकारण हे समाजकारण आहे, हे आता अनेकजण विसरताना दिसत आहेत. आपल्या प्रमुख नेत्यांच्या आहारी गेलेल्या कार्यकर्त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष ठेवले पाहिजे. कारण, आजच्या परिस्थितीत राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. पक्षीय विचारांपेक्षा, समाजहितापेक्षा नेत्यांचे गुणगान करताना कार्यकर्त्यांनी जरा जपूनच राहिले पाहिजे. गुणगान गाताना, दुसऱ्यावर टीकाटिप्पणी करताना कोणत्या स्तरापर्यंत केली पाहिजे हे प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची आज गरज आहे.

Social Media
CJI Chandrachud : सरन्यायाधीशांच्या या निर्णयाने मने जिंकली! कायदा मंत्र्यांनी केलं चंद्रचूड यांचं कौतुक

द्वेष पसरवणारे मेसेज टाळावेत

पक्षाच्या नेत्याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असताना वापरकर्त्यांनी, कार्यकर्त्यांनी नेत्यांचे गुणगान गाताना, त्यांचा उदो-उदो करताना आपल्या हातून इतरांचा द्वेष होणार नाही, भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विविध पक्षातील प्रमुख नेतेमंडळी हे कधी कोणत्या पक्षात जातील किंवा कोण कोणाबरोबर युती, आघाड्या करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नेहमी आपल्या भावनांना आवर घालत भडकावणारे मेसेजेस टाळले पाहिजेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com