गडचिरोलीत पूरस्थिती कायम; कोल्हापुरात संथ गतीने घट

Bhandara-District-Flood
Bhandara-District-Flood

नागपूर/कोल्हापूर - मध्य प्रदेशात पावसाचा जोर कायम असल्यामुळे पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांत पूर परिस्थिती तिसऱ्या दिवशीदेखील कायम होती. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी पूर ओसरला. मात्र, १२०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थांबल्याने नद्यांचे पाणी संथ गतीने ओसरण्यास सुरवात झाली आहे. पाणी ओसरण्याची गती संथ असली तरी, पुढील कालावधीत पाणी जलद ओसरेल, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला.

भंडारा जिल्ह्यात नद्यांच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने जिल्ह्यात सर्वदूर रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. परंतु मध्य प्रदेशात पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्वच विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. जिल्ह्यात पूर परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून बोट व इतर आधुनिक साहित्य सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्‍याचा संपर्क तिसऱ्या दिवशीदेखील जिल्हा मुख्यालयापासून तुटलेला होता. जिल्ह्यातील नद्या तिसऱ्या दिवशीदेखील ओव्हरफ्लो वाहत होत्या. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सर्वच रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com