
राज्यात सध्या विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे. यामध्ये मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांसाठी येत्या २६ जूनला मतदान होत आहे.
यासाठी ठाणे येथे आज भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासाठी विजयी संकल्प मेळाव्याचे आजोयन करण्यात आले होते. यामध्ये आमदार गणेश नाईक म्हणाले की, एकनाथ शिंदे हे प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री आहेत. आमच्यासाठी देवेंद्र फडणवीसच लीडर आहेत.
यावेळी आपल्या भाषणात आमदार गणेश नाईक म्हणाले, "एकनाथजी शिंदे राज्यासाठी मुख्यमंत्री आहेत. पण आमच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस इज आवर लीडर. मी तर हे ओपन बोलतो. प्रोटोकॉल म्हणून एकनाथ शिंदे राज्याचे प्रमुख आहेत. पण पक्षाच्या अनुशंगाने, देवेंद्र फडणवीस यांच्या अनुशंगानेच भाजपचे काम चालते आणि भविष्यातही ते चालणार आहे."
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला महाविकास आघाडीने चांगलाच दणका दिला.
यामध्ये गेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपची 9 जागांवर घसरण झाली. तर एकनाथ थिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागांवर विजय मिळाला. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मात्र एकच जागा मिळाली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अनपेक्षितपणे दमदार कामगिरी केली. काँग्रेसने महाविकास आघाडीतच नव्हे तर राज्यात सर्वाधिक 13 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 9 जगांवर विजय मिळवला तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.