Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Ganesh Naik Statement : गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’ असे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वाद पुन्हा उफाळला.
Ganesh Naik Eknath Shinde navi mumbai controversy

Ganesh Naik Eknath Shinde navi mumbai controversy

esakal

Updated on

Maharashtra Politics : राज्यात धर्म, जात आणि विविध प्रश्नांवरून आंदोलने सुरू असताना वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘काही लोकांनी लावलेल्या आगी आता विझत नाहीत. बाटलीतली भूतं बाहेर काढल्याने ती आता अंगाशी येत आहेत. त्यामुळे काढलेली भुतं पुन्हा बंद करण्याची ताकद ज्याच्यात असेल, त्यांनीच ती बाहेर काढावीत,’ अशी खोचक टीका नाईक यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com