बलात्कार प्रकरण : गणेश नाईक DNA चाचणीसाठी तयार, वकिलांमार्फत दिली माहिती

BJP MLA Ganesh Naik
BJP MLA Ganesh Naike sakal

मुंबई : एका महिलेने भाजप आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. याप्रकरणात वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस कोठडी हवी असल्याचं कारण पोलिसांनी दिलं होतं. त्यानंतर आता गणेश नाईक स्वतः डीएनए चाचणीसाठी तयार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

BJP MLA Ganesh Naik
गणेश नाईक यांच्या जामिनावर आज सुनावणी

काही दिवसांपूर्वी एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यांनी लग्नाचं आमिष देऊन वारंवार बलात्कार केला. तसेच आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो. त्यामधून एक मुलगा देखील झाला. पण, गणेश नाईक हे या मुलाला स्वीकारायला तयार नाहीत, असा आरोप महिलेने केला होता. तसेच माझ्या जीवाला धोका असून गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोपही महिलेने केला होता. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून पोलिसांना चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिस गणेश नाईक यांचा शोध घेत आहेत. पण, गणेश नाईक फरार झाले आहेत. अटकेपासून दिलासा मिळावा यासाठी नाईक यांनी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. पण, न्यायालयाने निर्णयासाठी २८ एप्रिलची तारीख दिली होती. पोलिसांनी गेल्या वेळी झालेल्या सुनावणीमध्ये वैद्यकीय तपासासाठी गणेश नाईक यांची पोलिस कोठडी हवी असल्याचं सांगितलं होतं. आज नाईक यांच्या याचिकेवर सुनावणी होणार असून त्यापूर्वी गणेश नाईक डिएनए चाचणीसाठी तयार असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com