मुख्यमंत्र्यांच्या बाप्पांचं घरच्या घरी विसर्जन

मुख्यमंत्र्यांच्या बाप्पांचं घरच्या घरी विसर्जन
Summary

राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनासाठी प्रशासनाने तयारी केली असून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. वर्षा निवासस्थानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये आज सायंकाळी श्री गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , त्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच परिवारातील सदस्य उपस्थित होते.

गेल्या दहा दिवसांपासून भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गणेश विसर्जनासाठी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. घरगुती गणेश विसर्जनासाठी पाच तर मंडळाच्या गणपतीसाठी दहा जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनासाठी प्रशासनाने तयारी केली असून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणे: सदाशिवपेठेमधील ताशा व ढोलच्या तालात गणेश विसर्जन

लालबाग च्या राजाचे विसर्जन झाले. मिरवणुकीतील गर्दी

lकोल्हापूरात गणेश मंडळांकडून शिस्तीचे पालन

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेश मंडळांनी बाप्पांना साधे पणानेच निरोप दिला. मास्क लावलेले मोजके कार्यकर्ते, टाळ्या आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि ठरलेल्या वेळेत शिस्तबद्धपणे मंडळांकडून मूर्ती विसर्जन केल्या जात होत्या. पोलिसांनी विसर्जन मार्ग, महत्वाचे चौक आणि इराणी खण यावर कडक बंदोबस्त ठेवला होता. किरकोळ वादाचे अपवाद वगळता सार्वजनिक गणपतींचे विसर्जन सुरळीत सुरू होते.

गोदावरी नदीवर गणपती विसर्जन करण्यासाठी गर्दी, मनोभावे गणपती बाप्पाला निरोप देत असलेले भाविक

लालबागच्या राजाचं थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली आहे. यावेळी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विसर्जन होत आहे. लालबागच्या राजाची मूर्ती यावेळी लहान आहे. विसर्जनासाठी फुलांचा खास रथ करण्यात आला आहे.

नागपूरच्या राजा गणपतीचे विसर्जन

नागपूरच्या राजा गणपतीचं कोराडी येथील तलावात विसर्जन करण्यात आलंय. यंदा मिरवणुकीला बंदी होती. त्यामुळे अगदी सध्या पद्धतीनं आणि मोजक्या लोकांच्या उपस्थिती मध्ये नागपूरच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. आज सकाळी विधिवत पूजाअर्चा आणि आरती करून नागपूरचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला होता. चार तासानंतर नागपूर शहराबाहेरील कोराडी तलावात क्रेन च्या साहाय्याने बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी वातावरण काहीसं भावनिक झालं होतं.

नाशिकचे जिल्हाधिकारी डॉ सुरज मांढरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे विसर्जन
नाशिकचे जिल्हाधिकारी डॉ सुरज मांढरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे विसर्जन

नाशिक : म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण येथे घरगुती गणपतीचे विसर्जन, सकाळपासून सुमारे हजार मूर्ती संकलन झाले आहे. दरम्यान, नाशिकमध्येही गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी वाद्य वाजवण्यात येत होती. तेव्हा ती वाद्ये पोलिसांकडून जप्त करण्यात आली.

लालबागचा राजा विसर्जन साठी अजून बाहेर पडलेला बघायला मिळतोय आणि लालबागचा आहे या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. शिवाय मोठ्या पोलिस बंदोबस्तामध्ये लालबागचा राजा विसर्जन साठी मार्गस्थ होताना बघायला मिळतोय. पोलिसांसोबत रॅपिड ऍक्शन फोर्स ही लालबागचा राजाच्या दोन्ही बाजूला पहायला मिळत आहे. या चोख बंदोबस्तामध्ये सध्या लालबागचा राजा विसर्जन साठी मार्गस्थ झाला आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर हिने

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी ढोल ताशा वादनाला परवानगी नसतानाही पथकाकडून वादन सुरु होते. यावेळी पोलिसांनी कारवाई करत ढोल ताशा जप्त केले आहेत. पोलिसांनी वादन करू नका असे सांगितलं असून कारवाई झाली नसल्याचं मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. तसंच ढोल ताशा बंद करण्यात आले आहे.

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. कोरोनामुळे भव्य अशी मिरवणूक नसली तरीही लालबागच्या राजासाठी खास रथ तयार करण्यात आला असून त्यातून विसर्जनासाठी लालबागचा राजा मार्गस्थ झाला आहे.

कोल्हापूर: शिवाजी चौकातील 21 फुटी महागणपती मिरवणुकीला सुरुवात. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
कोल्हापूर: शिवाजी चौकातील 21 फुटी महागणपती मिरवणुकीला सुरुवात. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

लालबाग परिसरात बंदोबस्त वाढवला

गणेशगल्ली मुंबईचा राजा मार्गस्थ होत असताना. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होण्याची शकयता नाकारता येत नाही. त्यामुळे लालबाग परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

औरंगाबाद - औरंगाबादचे ग्रामदैवत संस्थान गणपतीचे मोठ्या थाटात विर्सजन

नाशिक : चोपडा लॉन्स जवळील गोदा पार्क परिसरात गणपती विसर्जन सुरु आहे. यावेळी मराठी अभिनेता अभिजित खांडकेकर याने गणपतीची मूर्ती दान केली.

मुख्यमंत्र्यांच्या बाप्पांचं घरच्या घरी विसर्जन
Ganesh Visarjan 2021 Live : पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा

मानाच्या गणपतीने कोल्हापुरात विसर्जनास सुरुवात

कोलहापूर : कोल्हापुरातील सार्वजनिक मंडळाच्या गणेश विसर्जनाची सुरुवात रविवारी सकाळी झाली. मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणूकची सुरवात पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे, आयुक्त कादंबरी बलकवडे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे एड. धनंजय पठाडे, दिलीप देसाई विनायक फाळके, यांच्या उपस्थिती झाली. तसंच शिवाजी चौकातील महा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीवेळी फुलांची सजावट करण्यात आली आहे.

गणेशगल्लीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मुंबईचा राजाची मिरवणूक सुरु झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध असले तरी लोकांचा उत्साह मात्र कायम आहे. गणेश विसर्जनासाठी लोक गर्दी करत असून पोलिसांकडून गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे.

दहा वाजता लालबागच्या राजाची शेवटची आरती

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा राजाच्या विसर्जनासाठी फुल्लांचा रथ सजवण्यात आला आहे. १० वा. राजाची शेवटची आरती केल्यानंतर राजाची विसर्जन मिरवणुक दरवर्षीच्या मार्गक्रमनिकेनुसार गिरगाव चौपाटीला जाणार आहे. या वेळी मात्र कोरोना नियमांचे पालन करत लाडक्या राजाला निरोप दिला जाणार आहे.यासाठी पोलिसांनीही गर्दी होऊ नये.या अनुषंगाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com