

पुणे - मागील १० दिवसांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यांत खेड्यापाड्यात, वाडीवस्तीवर सुरू असलेल्या चैतन्यदायी गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (ता. १७) अनंत चतुर्दशीला होत आहे. या निमित्ताने पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर या शहरांसह विविध शहरांमध्ये विसर्जन मिरवणुकांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.