Konkan Railway: गणेशभक्तांना दिलासा! मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे?

CSMT-Sawantwadi Special Railway: मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे दिले जाणार आहेत. त्यामुळे मुंबई कोकणदरम्यान प्रवासासाठी गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे.
Konkan Railway

Konkan Railway

ESakal

Updated on

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबई आणि कोकणदरम्यान धावणाऱ्या गणपती विशेष गाडीला वीर आणि खेडदरम्यान सापे वामने आणि विन्हेरे येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सापे वामने, करंजाडी, विन्हेरे तसेच परिसरातील प्रवाशांना गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवासासाठी गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com