

राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. यादरम्यान तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला एका पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. बिझनेस टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.