
मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने एकूण 302 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्या मुंबई, पुणे आणि दिवा येथून कोकण तसेच गोव्यातील विविध स्थानकांदरम्यान धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणे अधिक सोयीचे होणार आहे.