
आरटीई प्रवेशासाठी निवासी पुरावा म्हणून 'गॅसबुक' रद्द
माळीनगर : शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी निवासी पुराव्यातील गॅसबुक हे रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली.(Gas book cancelled as residential proof for RTE admission)
हेही वाचा: भारत-पाकिस्तान फाळणीत झाली ताटातूट, तब्बल 74 वर्षांनंतर भेट!
या प्रवेशकरिता निवासी पुराव्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केली आहे.त्यासाठी रेशनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स,वीज,टेलिफोन बिल देयक,प्रॉपर्टी टॅक्स देयक,घरपट्टी,आधारकार्ड,मतदान ओळखपत्र,पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा ग्राहय धरला जाणार आहे.ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून अयोग्य किंवा अपूर्ण असतील तरच भाडेकरार हा निवासी पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येईल.यातील भाडेकरार हा (rent agreement)दुय्यम कार्यालयाचा नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. फक्त भाडेकरार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी. तसेच भाडेकरार हा ऑनलाईन फॉर्म (online form)भरण्याच्या दिनांकापूर्वीचा असावा व त्याचा कालावधी एक वर्षाचा असावा.
हेही वाचा: PM मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु; ठाकरेंऐवजी टोपेंची हजेरी
निवासी पुरावा म्हणून गॅसबुक (Gas book) गृहीत धरू नये असे शासन आदेश आहेत.या प्रवेशकरिता बँक पासबुक हे राष्ट्रीयीकृत बँकेचे असावे.स्थानिक बँकेचे तसेच पतसंस्थेचे पासबुक गृहीत धरू नये अशा शासनाच्या सुचना आहेत.आरटीई 25 टक्के प्रवेशाबाबतचे संभाव्य वेळापत्रक 29 डिसेंबरला जाहीर करण्यात आले असून पालकांना येत्या एक फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
Web Title: Gas Book Cancelled As Residential Proof For Rte Admission
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..