काळेनंतर सूत्रे गोंधळेकरकडे

Gauri Lankesh
Gauri Lankesh

मुंबई - पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी अमोल काळेला अटक झाल्यानंतर सुधन्वा गोंधळेकरने ग्रुपची सूत्रे हाती घेतल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती आली आहेत.

नालासोपारा स्फोटकेप्रकरणी आरोपी असलेला गोंधळेकर हा महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील 50 तरुणांच्या संपर्कात होता. त्यात गौरी लंकेश हत्येत अटक झालेल्या आरोपींचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नालासोपाऱ्यात स्फोटकांचा साठा जप्त करून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घातपाती कारवायांचा मोठा कट उद्‌ध्वस्त केला. या संपूर्ण कटकारस्थानात अटक केलेल्या सर्व आरोपींमध्ये पुण्यातून अटक केलेल्या गोंधळेकरचे स्थान सर्वांत वरचे होते. काळेच्या अटकेनंतर या ग्रुपच्या कारवाया सुरू ठेवण्यात त्याचा पुढाकार होता. लंकेश यांच्या हत्येपूर्वी त्यांच्या घराजवळ उभा असणारा तरुणही गोंधळेकर असल्याचा संशय आहे. त्यामुळे एटीएसची कोठडी संपल्यानंतर कर्नाटकचे विशेष पथक गोंधळेकरचा ताबा घेण्याची दाट शक्‍यता आहे.

गोंधळेकरची पार्श्‍वभूमी
पुण्यातून "डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग'चे शिक्षण घेतलेला गोंधळेकर हा मूळचा साताऱ्याचा आहे. त्याचा पुण्यात पर्वती परिसरात ग्राफिक डिझायनिंगचा व्यवसाय होता. नालासोपारा परिसरातून स्फोटकांसह वैभव राऊत व शरद कळसकर यांना अटक केल्यानंतर एटीएसने पुण्यातून गोंधळेकरला अटक केली होती. याप्रकरणी जालन्यातून माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरलाही अटक करण्यात आली आहे. तपासात गोंधळेकर खालोखाल पांगारकर व इतर आरोपी "फूट सोल्जर' असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याच माहितीवरून पुण्यातूनही शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला होता.

ग्रुपचे कारनामे
- सात वर्षांपासून पांगारकर, काळे व गोंधळेकर संपर्कात
- तरुणांची भरती, प्रशिक्षण, घातपाताचे कट यात सहभाग
- 20 हून अधिक तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण
- संपर्कासाठी बनावट कागदपत्रांच्या साह्याने सीम कार्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com