गौरी लंकेश हत्येतील मास्टरमाईंड सीबीआयच्या ताब्यात

Gauri Lankesh murder mastermind held in CBI custody
Gauri Lankesh murder mastermind held in CBI custody

मुंबई : पत्रकार गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी अमोल काळेचा केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने बुधवारी बेंगळुरू येथील तुरुंगातून ताबा घेतला. तो डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येतही मास्टरमाईंड असावा, असा सीबीआयच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. काळेला गुरुवारी पुण्यातील न्यायालयात हजर केले जाणार आहे. काळे आणि डॉ. दाभोलकर हत्याकांडातील संशयित सचिन अंदुरे यांची औरंगाबादमध्ये भेट झाली होती. त्यावेळी काळे तेथील लॉजवर राहिला होता.

औरंगाबादमधील वास्तव्यादरम्यान काळे याने अंदुरेला एक पिस्तूल दिले होते. हे पिस्तूल अंदुरेचा मेहुणा शुभम सुरळे याच्याकडे सोपवले होते. ते अलीकडेच सीबीआयच्या पथकाने दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) मदतीने शुभमचा मित्र रोहित रेगे याच्या घरातून हस्तगत केले. त्यामुळे काळेची चौकशी करणे गरजेचे असल्याने सीबीआयने त्याचा ताबा घेतला आहे. दरम्यान, काळेने अंदुरेकडे दिलेल्या पिस्तुलाबाबतचा अहवाल प्रलंबित असल्याचे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले.

अंदुरेच्या चौकशीसाठी परवानगी मागणार? 

डॉ. दाभोलकर हत्याकांडातील संशयित शरद कळसकर याच्या उपस्थितीत सीबीआयचे पथक अमित डेगवेकर, अमोल काळे व राजेश बांगेरा यांची चौकशी करणार आहे. अंदुरेच्या चौकशीची परवानगीही सीबीआयचे पथक न्यायालयाकडे मागण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com