Gautami Patil : गौतमी पाटील पहिल्यांदाच मुंबईत; सुरक्षिततेच्या बाबतीत उपस्थित केला मुद्दा

Gautami Patil
Gautami Patilesakal

मुंबईः मुंबईमध्ये दहीहंडीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. गौतमी पाटीलने आजवर महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. परंतु मुंबईत तीने पहिल्यांदाच कार्यक्रम केला. मुंबईतल्या सुरक्षेबद्दल गौतमी पाटीलने विधान केलं आहे.

गौतमी पाटील ही प्रथमच मुंबई देवीपाडा येथील आमदार प्रकाश सुर्वे आयोजित दहीहंडी उत्सवासाठी आली होती. यावेळी गौतमीने माध्यमांशी संवाद साधून मुंबईत आल्याने समाधान वाटलं, असं म्हटलं आहे.

Gautami Patil
Bachchu Kadu : दिव्यांगांसाठीचा निधींवरून बच्चू कडू आक्रमक; राज्य सरकारला दिला उपोषणाचा इशारा

गौतमी पाटील म्हणाली की, खूप छान वाटतंय. मी जास्त कार्यक्रम पुण्यात करते. आज मुंबईत कार्यक्रम करून छान वाटतंय. मी बरेच ठिकाणी जाते तिथं जसा प्रतिसाद असतो, तसाच इथेही मिळला. त्यामुळे चांगलं वाटत आहे.

गौतमी पुढे म्हणाली की, मला मुंबईत सुरक्षित वाटलं. इतर ठिकाणीही मी सुरक्षित आहे. दहीहंडी उत्सवात कार्यक्रम करता आल्याने समाधान वाटलं. आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये गौतमीने सहभाग नोंदवला.

Gautami Patil
Solar Energy : राज्यात लाख ग्राहकांकडून छतावरील सौरऊर्जा निर्मिती

दरम्यान, मागच्या काही दिवासांपासून गौतमी पाटीलचे कार्यक्रम कमी झाले होते. आता दहीहंडीपासून राज्यभर पुन्हा कार्यक्रम सुरु होत आहेत. गौतमी पाटीलला बघण्यासाठी मुंबईमध्ये मोठी गर्दी झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com