Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे राजपत्र प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

राज्यात मराठा आरक्षण लागू झाले असून राज्यपालांच्या सहीनंतर राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून आजपासून मराठा समाजासाठी आरक्षण लागू झाले आहे.

मुंबई- राज्यात मराठा आरक्षण लागू झाले असून राज्यपालांच्या सहीनंतर राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून आजपासून मराठा समाजासाठी आरक्षण लागू झाले आहे.

राज्यपालांनी शुक्रवार काल (ता.30) विधीमंडळाच्या कायद्याला मंजूरी देत सही केल्यानंतर आज तातडीने हा कायदा राजपत्रात प्रसिध्द करण्यात आला आहे. ज्या क्षणी राजपत्र प्रसिध्द झाले त्याच क्षणापासून राज्यात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण लागू झाले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याला न्यायालयीन आव्हान मिळाल्यास ते खोडून काढण्यासाठी सरकारने भक्कम रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय कायम राहील, यासाठी 2000 मध्ये संसदेने केलेल्या 81 व्या घटनादुरुस्तीचा मजबूत आधार घेण्याचा सरकारचा मानस आहे.

Web Title: Gazette of Maratha Reservation is Published